भारताला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा एलिसा हेलीला विजयी निरोप

पर्थ : ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक पिंक बॉल कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने तिसऱ्या दिवशीच भारतीय महिला संघाला १० विकेट्सनी पराभव करत कर्णधार एलिसा हिली हिला विजयी आणि अविस्मरणीय निरोप दिला. या सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियासमोर २५ धावांचेच लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाने ४.३ षटकातच बिनबाद २८ धावा करत पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाकडून जॉर्जिया वॉल १६ धावांवर आणि फोबी लिचफिल्ड ११ धावांवर नाबाद राहिली.


पिंक बॉल टेस्टमध्ये पहिल्या डावात भारतीय संघाकडून जेमिमा रॉड्रिग्जचे ८४ (५२) अर्धशतक वगळता एकाही बॅटरचा निभाव लागला नाही. परिणामी पहिल्या डावात भारतीय संघ १९८ धावांत ऑलआउट झाला होता. ॲनाबेल सदरलँड १२९ (१७१) आणि एलिसा ७६ (११६) दमदार खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डावात ३२३ धावा करत १२१ धावांची मोठी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात भारतीय संघ १४९ धावांत आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाला फक्त २५ धावांचे टार्गेट मिळाले होते. ऑस्ट्रेलियन सलामीच्या बॅटर्संनी पाचव्या षटकातच ते पार केले.


प्रतिका रावलने ६८ धावांच्या खेळीशिवाय स्नेह राणाने ३० धावांचे योगदान दिले. या दोघींनी अर्धशतकी भागीदारी केल्यामुळे भारतीय संघावरील डावाने पराभूत होण्याचे संकट टळले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील तीन सामन्यांची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली होती. पण त्यानंतर एकदिवसीय मालिकेतील ३-० अशा पराभवानंतर भारतीय संघाने एकमेव कसोटी मालिका तिसऱ्या दिवशीच गमावल्याचे पाहायला मिळाले.


निवृत्तीनंतर खांद्यावर उचलून घेत मानवंदना


ऑस्ट्रेलियाची दिग्गज खेळाडू एलिसा हिलीसाठी पिंक बॉल टेस्टही खास ठरली. याआधी तिने भारतीय संघाविरुद्धच्या शतक साजरे करून वनडे कारकिर्दीतील सामना खास केला होता. त्यानंतर आता कसोटी क्रिकेटमधील शेवटच्या सामन्यातही तिने संघाला विजय मिळवून देत निरोपाचा सामना अविस्मरणीय केला. सामना संपल्यावर ऑस्ट्रेलियन संघातील खेळाडूंनी कॅप्टन एलिसा हिली हिला खांद्यावर बसवून फेअरवेल दिल्याचा खास क्षणही पाहायला मिळाला.


एलिसा हेलीची कारकिर्द


वयाच्या १९ व्या वर्षी ऑस्ट्रेलियासाठी २०१० मध्ये पदार्पण केलेल्या एलिसा हेलीने ११ कसोटी सामन्यात ३ अर्धशतकांसह ५०२ धावा केल्या आहेत. तसेच १२६ वनडे सामन्यांमध्ये तिने ८ शतके आणि १९ अर्धशतकांसह ३७७७ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १६२ सामन्यांत तिने १ शतक आणि १७ अर्धशतकांसह ३०५४ धावा केल्या. ती महिला आणि पुरुष मिळून आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारी यष्टीरक्षक देखील आहे. तिने आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये यष्टीरक्षक म्हणून १२६ विकेट्स घेतले असून यात ६३ झेल आणि ६३ यष्टीचीतचा समावेश आहे. हेलीने तिच्या कारकिर्दीत एकूण ७ वर्ल्ड कप जिंकले, ज्यात २०१०, २०१२, २०१४, २०१८, २०२० आणि २०२३ अशा पाच टी२० वर्ल्ड कपचा आणि २०१३ आणि २०२२ या वनडे वर्ल्ड कपचा समावेश आहे. ती २०१८ आणि २०१९ मध्ये आयसीसीची सर्वोत्तम महिला टी२० खेळाडूचा पुरस्कार जिंकणारी खेळाडू आहे.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल