गोरेगाव भागात मंगळवारी राहणार पाणीकपात

उड्डाणपुलाच्या मार्गातील ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी वळवणार


मुंबई : गोरेगाव (पूर्व) येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी मार्गावरील उड्डाणपुलाच्या पोहोच रस्ता भागात येणाऱ्या ७५० मिलीमीटर व्यासाच्या वळविण्यात आलेल्या जलवाहिनीच्या छेद जोडणीचे काम मंगळवार १० मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेपासून बुधवार ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. या २४ तासांच्या कालावधीत ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.


परिसरातील नागरिकांनी, पाणीपुरवठा बंद असण्याच्या अगोदरच्या दिवशी आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा. तसेच, पाणीपुरवठा बंद असलेल्या कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जलवाहिनीच्या कामानंतर पुढील काही दिवस गढूळ पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पाणी गाळून व उकळून प्यावे तसेच महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे विनम्र आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या दुरुस्ती कामाच्या प्रत्यक्ष कालावधीत ‘पी पूर्व’ आणि ‘पी दक्षिण’ विभागातील खालील परिसरांमध्ये पाणीपुरवठा बंद तर काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.



विभाग परिसर -


पी पूर्व विभाग : शिवशाही प्रकल्प,(पाणीपुरवठा बंद राहील)


पी पूर्व विभाग : श्रीकृष्ण नगर, इंदिरा गांधी संशोधन संस्था (पाणीपुरवठा बंद राहील)


पी दक्षिण विभाग : सॅटेलाईट टॉवर, संतोष नगर, माळी नगर, हबळे पाडा, उमरशेट पाडा, नगरमोडे पाडा, सुनील मैदान, फिल्म सिटी मार्गालगतचा परिसर ( पाणीपुरवठा बंद राहील)


पी दक्षिण विभाग : मोहन गोखले मार्ग, कृष्णा वाटिका मार्ग, साई मार्ग व आर्य भास्कर मार्ग (कमी दाबाने पाणीपुरवठा)

Comments
Add Comment

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या

Maharashtra FDA : FDAची मोठी कारवाई! मुंबईतील 7 ठिकाणांचे परवाने निलंबित; गुटखा प्रकरणात 6 जणांना अटक

मुंबई : महाराष्ट्रात अन्न सुरक्षेबाबत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई केली आहे. 19 आणि 20 ऑगस्ट रोजी राबवण्यात