Saturday, March 7, 2026

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लॉक असून रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉ़क नाही.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा – मुलुंडदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.१० पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल माटुंगा – मुलुंडदरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील. ठाण्यापलीकडे जाणाऱ्या जलद लोकल मुलुंड स्थानकात पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील लोकल मुलुंड स्थानकात अप धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मुलुंड – माटुंगादरम्यान त्यांच्या निर्धारित थांब्यांवर थांबतील आणि माटुंगा स्थानकात पुन्हा अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात देखभालीच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वेवर केवळ शनिवारी ब्लॉक असल्याने रविवारी प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वे

कुठे : माहीम – सांताक्रूझ स्थानकादरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर कधी : शनिवारी रात्री १ ते पहाटे ४.३० पर्यंत परिणाम: ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल – सांताक्रूझदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल. जलद लोकलच्या फलाटाअभावी महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांत लोकल थांबा नसेल. तर, लोअर परळ, माहीम आणि खार रोड येथील फलाटाची लांबी कमी असल्याने दोन वेळा लोकल थांबा असेल. ब्लाॅकमुळे काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील. पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसकालीन ब्लाॅक नाही.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल सेवा चालवल्या जातील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

Comments
Add Comment