Nepal election results : Gen Z ची सत्ता येणार? बालेन शाह यांच्या नावाची जोरदार चर्चा

नेपाळमधील निवडणुकीचे निकाल आता टप्प्याटप्प्याने समोर येऊ लागले आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये बालेन शाह यांच्या पक्षाची जोरदार आघाडी दिसून येत आहे. प्रारंभीच्या निकालांनुसार बालेन शाह यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीला (RSP) मोठे यश मिळताना दिसत असून पारंपरिक राजकीय पक्षांना मोठा फटका बसत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार सध्या ६१ जागांवरील मतमोजणी सुरू आहे. त्यापैकी ५२ जागांवर बालेन शाह यांचा पक्ष आघाडीवर आहे. तर नेपाळी काँग्रेस ५ आणि यूएमएल ४ जागांवर पुढे असल्याचे चित्र आहे. याशिवाय माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक माजी पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि मंत्री सध्या मतमोजणीत मागे असल्याचेही समोर आले आहे.


नेपाळमध्ये गुरुवारी (५ मार्च) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. Gen Z च्या आंदोलनानंतर देशात प्रथमच ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे. या आंदोलनामुळे केपी शर्मा ओली यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले होते. या निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रमुख ठरल्याचेही पाहायला मिळाले.





बालेन शाह यांची वाढती लोकप्रियता :


प्रसिद्ध रॅपर आणि इंजिनिअर म्हणून ओळख असलेले बालेन शाह आता प्रभावी राजकीय नेते म्हणून पुढे येत आहेत. काठमांडूचे महापौर म्हणून त्यांनी काम केले असून त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (RSP) या नव्या पक्षाने नेपाळमधील दोन जुन्या राजकीय पक्षांना मोठे आव्हान दिले आहे. २०२२ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाला प्रचारादरम्यान जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यामुळे बालेन शाह यांना पंतप्रधानपदाचे प्रमुख दावेदार मानले जात आहे.


नेपाळमध्ये एकूण २७५ जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी १६५ सदस्य थेट मतदानातून निवडले जातात, तर उर्वरित ११० सदस्य प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन (PR) पद्धतीने निवडले जातात. थेट निवडणुकीसाठी ३४०० उमेदवार मैदानात होते, तर PR कोट्यातील ११० जागांसाठी ३१३५ उमेदवार रिंगणात होते.

Comments
Add Comment

नेपाळमध्ये सत्तांतरानंतर नवा संदेश; बालेन शाह- मोदी संवादातून संबंध दृढ होण्याचे संकेत

काठमांडू : नेपाळच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीनंतर नव्या नेतृत्वाचा उदय झाला आहे. बालेन शाह यांनी

Nepal News : नेपाळमध्ये राजकीय भूकंप! नवनिर्वाचित पंतप्रधान बालेन शाह यांच्या कारवाईत माजी पंतप्रधान आणि गृहमंत्री यांना अटक

नेपाळमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांना पोलिसांनी अटक केली आहे. भक्तपूरमधील

Iran-US-Israel War : इराणने केले अमेरिका-इस्रायलवर गंभीर आरोप

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी शुक्रवारी (२७ मार्च) अमेरिका आणि इस्रायलवर तीव्र टीका केली. संयुक्त

Pakistan embassy in Tehran : तेहरानमधील पाकिस्तानी दूतावासाजवळ धमाके; परिसरात भीतीचे वातावरण

तेहरान मधील पाकिस्तानी दूतावास आणि राजदूताच्या निवासस्थानाजवळ शक्तिशाली बॉम्बस्फोट झाल्याची धक्कादायक घटना

Iran-US-Israel War : अमेरिका बॅकफूटवर ? राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामात पुन्हा वाढ

- डोनाल्ड ट्रम्प यांनी युध्दविरामची मुदत थेट ६ एप्रिलपर्यंत वाढवली अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या

अमेरिकेने घेतलेल्या निर्णयामुळे जगावर काय परिणाम होणार?

नवी दिल्ली: इराण-अमेरिका युद्ध संघर्षात इराण आणि इस्रायल होरपळून निघाले आहेत. या युद्धाच्या झळा इतर देशांना