Maha Budget 2026 : राज्याच्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत राज्याचा २०२६ - २७ आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात देशाची आर्थिक राजधानी आणि राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या विकासासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या.


जानेवारी २०२६ मध्ये प्रदीर्घ काळानंतर मुंबई महापालिकेत भारतीय जनता पार्टीचा महापौर झाला. त्यानंतर सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी भरीव तरतुदी आहेत.



राज्याच्या २०२६ - २७ च्या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळाले ?



  1. मुंबई महानगर प्रदेशाची अर्थव्यवस्था २०३० पर्यंत १४० अब्ज डॉलर्सवरून ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत नेणार

  2. वडाळा येथे १३० एकर जमिनीवर जागतिक दर्जाचे स्टार्टअप आणि इनोव्हेशन हब करणार

  3. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या ठाणे तलासरी मार्गाचे काम २०२७ अखेरपर्यंत पूर्ण होणार

  4. अटल सेतू परिसरात तिसरी मुंबई विकसित करणार

  5. वाढवण जिल्हा, पालघर येथे चौथी मुंबई विकसित करणार, चौथ्या मुंबईत लॉजिस्टिक आणि विकास केंद्रे निर्माण करणार

  6. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत मुंबईतील २० लाख घरांच्या पुनर्विकासासाठी तसेच भाडे तत्वावरील घरांसह १० लाख घरे विकसित करण्यासाठी बृहन्मुंबई आराखडा तयार करणार

  7. मुंबई महापालिका क्षेत्रात नवी झोपडपट्टी उभी राहणार नाही यासाठी GIS आधारे मॅपिंगचा वापर करून No New Slum Framework विकसित करणार

  8. वडाळा ते गेट ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका ११ यासाठी २३ हजार ४८७ कोटी किंमतीचा भूमिगत प्रकल्प उभारणार. या प्रकल्पाचा विस्तार धारावी पुनर्विकास प्रकल्पातून पुढे वांद्रे उपनगरी स्थानक आणि वांद्रे टर्मिनसपर्यंत करण्याची योजना

  9. मुंबई ते नवी मुंबई विमानतळ जोडणारा मेट्रो ८ यासाठी २२ हजार ८६२ कोटी किंमतीचा प्रकल्प उभारणार

  10. पूर्व आणि पश्चिम उपनगराला जोडणाऱ्या गोरेगाव मुलुंड भूयारी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात

  11. ठाणे ते बोरिवली या १८ हजार ८३८ कोटींच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर, जून २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल

  12. वांद्रे वरळी सागरी सेतू ते बुलेट ट्रेन स्थानक, वांद्रे कुर्ला संकुल ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भूयारी मार्गाने जोडण्यात येईल.

  13. अटल सेतू ते मुंबई कोस्टल मार्ग आणि वांद्रे वरळी सागरी मार्ग या रस्त्यावर सिग्नलविरहित वाहतुकीसाठी शिवडी-वरळी उन्नतमार्गाचे काम प्रगतीपथावर, सप्टेंबर २०२६ पर्यंत हे काम पूर्ण होईल.

  14. अटल सेतू ते मुंबई-पुणे द्रूतगती मार्ग जोडणारा १ हजार १०२ कोटी किंमतीचा उन्नत मार्ग फेब्रुवारी २०२७ पर्यंत पूर्ण करणार

  15. दक्षिण मुंबईला समृद्धी महामार्गाशी थेट जोडण्यासाठी छेडा नगर ते आनंद नगर आणि आनंद नगर ते साकेत, ठाणे उन्नत मार्गाचे काम डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करणार

  16. वांद्रे ते वर्सोवा सागरी सेतू या मार्गाचे चारही टप्प्यातील काम प्रगतीपथावर हा प्रकल्प मे २०२८ पर्यंत पूर्ण करणार

  17. वर्सोवा -दहिसर-भाईंदर या २२ हजार १६६ कोटी किंमतीच्या किनारी मार्ग प्रकल्प सुरू असून डिसेंबर २०२८ पर्यंत हा मार्ग पूर्ण करणार

Comments
Add Comment

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुरंदर विमानतळापर्यंत थेट बोगदा; मेट्रोसह वाहनांसाठी स्वतंत्र मार्ग

पुणे : पुणे (Pune) आणि आसपासच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुरंदर येथे प्रस्तावित छत्रपती

Gold-Silver Price 18 August 2026 : आनंदवार्ता! सोने - चांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे नवीन भाव

मुंबई : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आजची महत्त्वाची बातमी आहे. मंगळवार, 18 ऑगस्ट 2026 रोजी सोन्या-चांदीच्या दरात

Pakistan Saudi Arabia : 'सऊदी अरबमध्ये भीक मागू नका’; पाकिस्तानने हज-उमराह यात्रेकरूंना का दिली कडक ताकीद?

इस्लामाबाद : पाकिस्तान सरकारने आपल्या नागरिकांना सौदी अरेबियात भीक मागू नये आणि परवानगीशिवाय पैसे गोळा करू

Devendra Fadnavis : मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांचा निर्णय बदलण्याचा अधिकार; महाराष्ट्र शासनाच्या नियमांत महत्त्वाचा बदल

मुंबई : महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. राज्य सरकारने ‘महाराष्ट्र शासन

Divyanag Pension : मुंबईतील दिव्यांग व्यक्तींना पेन्शन; महिला आणि बाल कल्याण समितीच्या कामकाजाचा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आढावा

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : २०२५-२६ पासून बंद असलेली धर्मवीर आनंद दिघे दिव्यांग पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याचे