जाणून घ्या आजच्या संकष्टी चतुर्थीची वेळ, शुभमुहूर्त आणि व्रत करण्याचे फायदे

मुंबई : हिंदू कालगणनेत संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. त्या महिन्यांनुसार संकष्टीचे महत्वही वेगळे आणि व्रतवैकल्य ही वेगळी असतात. ही पूजा अर्चना फलदायी मानली जातात.


मराठी फाल्गुन महिन्यात आणि इंग्रजी मार्च महिन्यात येणाऱ्या हा चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असे म्हणतात, यावेळी ही चतुर्थी ६ मार्च २०२६ रोजी आहे. ही संकष्टी तिथी ५.५३ वाजता सुरु होणार असून याच दिवशी चंद्रोदयव्यापिनी तिथिनुसार व्रत केले जाईल. या निमित्ताने चंद्रोदयाच्या वेळा, पूजेचा शुभ मुहूर्त आणि शास्त्रोक्त विधी सविस्तर जाणून घेऊयात.


फाल्गुन महिन्यात कृष्ण पक्ष चतुर्थी भालचंद्र संकष्टी म्हणून ओळखली जाते. या दिवशी गणपती बाप्पाच्या भालचंद्र रुपाची पूजा केली जाते. हिंदू धर्मग्रंथांनुसार, भालचंद्र संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्यास जीवनातील गंभीर समस्यांवर मात करण्यास मदत मिळते, असे म्हणतात. हे व्रत चार वर्षे किंवा १३ वर्षे करण्याचा सल्ला दिला जातो. हा कालावधी पूर्ण झाल्यावर व्रताचे उद्यापन करावे. व्रत करण्यासाठी 'चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी' तिथी निवडली जाते. जर दोन दिवस चंद्रोदयव्यापिनी चतुर्थी असेल, तर उपवासासाठी पहिल्या दिवसाची निवड करावी.




भालचंद्र संकष्टी चतुर्थी २०२६ तिथी :


चतुर्थी तिथी आरंभ : ६ मार्च संध्याकाळी ५.५३ वाजता होईल.
चतुर्थी तिथी समाप्त : ७ मार्च संध्याकाळी ७.१७ वाजता होईल.



भालचंद्र संकष्टीचे व्रत कसे करावे


पहाटे उठून स्नान करा आणि स्वच्छ कपडे परिधान करा.


भगवान गणेशाचे ध्यान करून व्रत पाळण्याचा आणि मौन धारण करण्याचा संकल्प करावा.


संध्याकाळी पुन्हा स्नान करा, शक्य नसल्यास हात-पाय स्वच्छ धुऊन घ्या.


यानंतर चौरंग मांडावा, त्यावर श्रीगणेशाची मूर्ती स्थापित करावी. शास्त्रोक्त विधीनुसार श्री गणेशाची षोडशोपचार पूजा करावी.


संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीला त्यांचा आवडता पदार्थ मोदक, सुपारी, मूग आणि दुर्वा अर्पण कराव्या.


गणपती बाप्पाची पूजा संपन्न झाल्यानंतर, चंद्रोदयाच्या वेळी चंद्रदेवाची गंध, फुले इत्यादी गोष्टी अर्पण करून पूजा करावी आणि अर्घ्य तसेच नैवेद्य अर्पण करावा.


त्याच दिवशी व्रताचे पारण करावे. या व्रतामध्ये तेलकट पदार्थांचे सेवन करणे वर्ज्य आहे.



शुभ मुहूर्त :


अभिजित मुहूर्त दुपारी १२.१० ते दुपारी १२.५७ वाजेपर्यंत असेल.


गोधुली मुहूर्त संध्याकाळी ६.२२ वाजेपासून ते संध्याकाळी ६.४७ वाजेपर्यंत असेल.


अमृत काळ मुहूर्त पहाटे ४.२३ वाजेपासून ते पहाटे ६.०६ (७ मार्च) वाजेपर्यंत असेल.


विजय मुहूर्त दुपारी २.३० वाजेपासून ते दुपारी ३.१७ वाजेपर्यंत असेल


ब्रह्म मुहूर्त पहाटे ५.०३ वाजेपासून ते पहाटे ५.५३ वाजेपर्यंत असेल.

Comments
Add Comment

उत्तर-पश्चिम मुंबईत महिला दिनानिमित्त ‘साडी वॉकाथॉन’

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने उत्तर-पश्चिम मुंबईतील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) महिला

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी