दहिसर आणि बोरीवलीला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली जलाशयाचे बांधकाम झाले जुने; महापालिका तातडीने घेणार दुरुस्तीचे काम हाती

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली आणि दहिसर विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या बोरीवली टेकडी जलाशयाचे बांधकाम जुने झाले असून या जलााशयातून काही प्रमाणात पाण्याची गळती होत आहे. तसेच मोठ्याप्रमाणात पाण्याचा साठा करता येत नाही. त्यामुळे या जुन्या जलाशयाची तातडीन दुरुस्ती करण्याची आता गरज भासली आहे.


मुंबई महानगरपालिकेतर्फे आर/मध्य विभागात बोरीवली टेकडी जलाशय क्र.२ व ३ मधून बोरीवली व दहिसर परिसरातील विविध भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. बोरीवली टेकडी जलाशय क्र. २ हा जलाशय सन १९९२ मध्ये बांधलेला आहे. त्याची पाण्याची साठवण क्षमता ३६.२ दशलक्ष लिटर्स एवढी आहे. तर बोरीवली टेकडी जलाशय क्र. ३. सन १९९६ मध्ये बांधलेला असून त्याची पाण्याची साठवण क्षमता ३६.४ दशलक्ष लिटर्स आहे. या दोन्ही जलाशय सुमारे ३० वर्षापेक्षा जुने असल्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या तांत्रिक सल्लागारांमार्फत या जलाशयांचे संरचनात्मक लेखापरिक्षण घेण्यात आले.


या स्ट्र्क्चरल ऑडीटनुसार दोन्ही जलाशयांना तातडीने व्यापक संरचनात्मक दुरुस्तीची आवश्यकता आहे. त्यामुळे या दोन्ही जलाशयांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज भासली आहे. महापालिका जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जलाशयांची पाणी साठवण करण्याची क्षमता जेवढी आहे, तेवढी करता येत नाही. त्यामुळे येथील परिसराला कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. ही बाब लक्षात घेऊन या दोन्ही जलाशयांची तातडीने दुरुस्ती करण्यात येत आहे


या जलाशयाच्या दुरुस्ती कामांमुळे जलाशयाच्या विद्यमान छतावरील असलेले जलप्रतिबंधक आवरण काढण्यात येईल. सिमेंट काँक्रिटच्या भागाचे लोखंडी सळयापर्यंतचे आवरण काढून लोखंडी सळ्यांची गंज काढणे आणि त्यावर गंज प्रतिबंधक उपाययोजना करणे. त्यावर व्हॉल्व बसवणे आदी प्रकारणी कामे केली जाणार आहे. या दोन्ही जलाशयांच्या दुुरुस्ती कामांसाठी सुमारे ३७ कोटी रुपये एवढा खर्च केला जाणार आहे. जलाशयाच्या दुरुस्ती कामांसाठी एपीआय सिव्हिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे.

Comments

अजित ओझलकर    March 6, 2026 01:32 AM

परीस्थिती बिघडण्याआधी हे काम पूर्ण झाले पाहिजे.

Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य