सिंधुदुर्गच्या विकासासाठी पर्यावरणाचा समतोल आणि जनहिताला प्राधान्य

मुंबई : केंद्र शासनाच्या २४ फेब्रुवारी २०२६ रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग च्या विविध पर्यावरणविषयक विविध मुद्द्यांवर आज मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून, यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी- दोडा मार्गचा विकास आणि पर्यावरण संवर्धन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.


बैठकीत सिंधुदुर्ग च्या पर्यावरण, वने आणि हवामान बदल विभागाशी संबंधित विविध तांत्रिक अडचणींचा आढावा घेण्यात आला. विकासकामे करताना पर्यावरणाची हानी होणार नाही आणि स्थानिक नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.


केंद्र सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांवर आणि रोजगारावर काय परिणाम होऊ शकतो, यावर चर्चा करण्यात आली. 'विकास आणि पर्यावरण यांचा समतोल राखताना स्थानिक जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे,' असे मत मंत्री नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले. प्रलंबित प्रश्न आणि विकासकामांवर होणारे परिणाम यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी कार्यवाहीची दिशा या बैठकीत निश्चित करण्यात आली.


या बैठकीस माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे,पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, सिंधुदुर्ग च्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, उपवन संरक्षक मिलनकुमार शर्मा, महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव भारतसिंग, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या शेवटी, सिंधुदुर्ग च्या जैवविविधतेचे संवर्धन आणि विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करताना स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊनच प्रशासन पावले उचलेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे