क्रेडाई नाशिक मेट्रोतर्फे जळगावमध्ये ७,८,९ मार्च रोजी प्रॉपर्टी एक्स्पो

जळगाव व नाशिक हे दोन्ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य प्रगतिशील शहर म्हणून ओळखले जाते. औद्योगिक शैक्षणिक, आरोग्य तसेच कृषि यावर आधारित अनेक उद्योग संधी नाशिकमध्ये उपलब्ध आहेत. याच नाशिक मध्ये रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अपरिमित संधी आहेत. या संधींची माहिती एकाच छताखाली मिळावी यासाठी बांधकाम व्यावसायिकांची देशातील सर्वात मोठी संस्था क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे येत्या ७ से ९ मार्च दरम्यान सागर पार्क ग्राउंड येथे नाशिक प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी दि.५ मार्च गुरुवार रोजी जळगाव येथील रॉयल पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. ते पुढे म्हणाले हवेची गुणवत्ता आणि पाण्याची मुबलकता याचे वरदान लाभलेल्या नाशिक मधील हवामान अनेकांना आकर्षित करते. तसेच मुंबई पुण्यापासून कमी अंतर आणि जगभरातील सर्व प्रमुख शहरां सोबत वाढलेली या शहराची कनेक्टिव्हिटी यामुळे नाशिक मधील रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही भविष्यात लाभदायी ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. चेन्नई- सुरत महामार्ग, नाशिक जवळ विकसित होत असलेले बाढवण बंदर या सोबतच नुकत्याच समृ‌द्धी महामार्ग खानदेश एक्सप्रेस वेद्वारे जळगावला सहा पदरी रस्त्याने जोडण्याच्या घोषणेमुळे जळगाव आणि नाशिकची कनेक्टिव्हिटी वाढणार आहे.


प्रदर्शनाबद्दल माहिती देताना प्रदर्शनाचे समन्वयक सागर शहा म्हणाले, क्रेडाई सदस्य म्हणजे विश्वासार्ह व्यवहार असे समीकरण रुढ झाले आहे. सुमारे २८ वर्षापासून कार्यरत क्रेडाई ही राष्ट्रीय स्तरावरील बांधकाम व्यावसायिकांची सर्वात मोठी संस्था असून आज मीतिला २३० शहरांमध्ये ३००० बांधकाम व्यावसायिक या संस्थे सोबत जोडले आहेत. जळगाव येथे आयोजित या प्रदर्शनात नाशिकचे अनेक आघाडीचे विकसक सहभागी होणार असून फ्लॅट्स, प्लॉट्स, फार्म हाऊस, शॉप्स ऑफिसेस यांचे असंख्य पर्याय इथे उपलब्ध असतील. प्रदर्शनाचा लेआउट व व्यवस्था आंतरराष्ट्रीय स्तराला साजेशी असल्याचेही त्यांनी नमूद केले.


प्रदर्शनाचे सह समन्वयक अनंत ठाकरे म्हणाले नाशिकमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्यामुळे नाशिक मध्ये लाखो भाविक आगामी दीड वर्षाच्या कालावधीत येणार आहेत. यामुळे रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीला परतावा मिळण्याची शक्यता अधिक आहे. यासोबतच विविध क्षेत्रातील उपलब्ध संधीमुळे देखील भविष्यातील गुंतवणूक म्हणजे नाशिक रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूक असे म्हणणे वावगे ठरणार नसल्याचेही त्यांनी सांगितले. या तीन दिवसीय प्रॉपर्टी एक्सपोमध्ये नाशिक सोबतच इगतपुरी, कसारा, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी या भागातील अनेक पर्याय उपलब्ध राहणार असून प्रदर्शनाचे प्रायोजक म्हणून अर्बन स्टाईल्स व सहप्रायोजक म्हणून क्रिश गुपने जबाबदारी स्वीकारली असल्याची माहिती क्रेडाई नाशिक मेट्रोचे मानद सचिव तुषार संकलेचा यांनी दिली. प्रदर्शनाची वेळ सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत असणार आहे .


क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खीवंसरा यांनी अधिक माहिती देताना सांगितले की, जळगाव आणि नाशिक चे गेल्या पन्नास पेक्षा जास्त वर्षांपासून विविध स्वरूपात जुने नाते आहे. नाशिक शहर हे रामायण काळातील श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पद स्पर्शाने पावन झालेली धार्मिक आणि अध्यात्मिक भूमी आहे. सन २००० साल नंतर ज्या प्रमाणे पुणे शहर झपाट्याने विकसित झाले तसेच बदलत्या काळात नाशिक शहर देखील सर्वच क्षेत्रात आधुनिकतेकडे विकसित होत आहे. मंत्र भूमी ते तंत्रभूमी अशी पौराणिक ओळख असलेले नाशिक एज्युकेशन हब झाले असून वाईन कॅपिटल देखील आहे. मुंबई, पुणे व अन्य महानगरातील न परवडणारे महाग शिक्षण नाशिकला नाही. शैक्षणिक खर्चाची तफावत बघता अन्य राज्यातील, महाराष्ट्रातील विविध भागातील विद्यार्थी व सर्व स्तरावरील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नाशिकला वाढत असल्याने शिक्षण संस्था वाढत आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेले या शहरात अन्य महानगरां सारखी सतत वाढणारी लोकसंख्या, वाढती वाहने त्यामुळे रहदारीची कोंडी, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण त्या मानाने कमी प्रमाणात दिसून येते ! त्यामुळे नाशिक येथे शिक्षणासाठी, उद्योग व्यवसाय करिता किंवा रिटायर्ड झाल्या नंतर स्थायिक होणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच बारा वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्या नंतर नाशिकचा प्रचंड असा विकास साधला जाणार आहे .नाशिकला पंधरा लाखांपासून ते दहा कोटी किंमती पर्यंत असलेल्या सर्व सुसज्ज सोय सुविधा असलेल्या प्रॉपर्टी चे जळगाव एक्सपो मध्ये भारतातील वीस मोठे नामवंत बिल्डर भाग घेणार असून २८ स्टॉल लावले जाणार आहेत. दीपक भाई यांनी पुढील माहितीत सांगितले की, प्रॉपर्टी स्टॉल सोबत विविध प्रकल्पांचे देखील सादरीकरण या एक्सपो केले जाणार आहे. म्हणून नाशिक मध्ये प्रॉपर्टी घेण्याची इच्छा असलेल्या जळगावकरांनी या संधीचा लाभ घेण्यासाठी अवश्य भेट देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


हे प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी क्रेडाई नाशिक मेट्रोचे उपाध्यक्ष मनोज खिवसरा, उदय घुगे, अनिल आहेर, अंजन ,भालोदिया, आयपीपी कृणाल पाटील, कोषाध्यक्ष श्रेणिक सुराणा, सहसचिव नरेंद्र कुलकर्णी, सचिन बागड, हंसराज देशमुख,, मॅनेजिंग कमिटी सदस्य श्यामकुमार साबळे, विजय बव्हाणके, निजित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सहयोगी सदस्य सतीश मोरे, सुशात गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, मनोज लाहानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, क्रेडाई युवा विंग समन्वयक आदित्य भातंबरेकर, सह समन्वयक अजिंक्य नाहर हे विशेष सहकार्य करीत आहेत.

Comments
Add Comment

Kunal Shah : मुंबईकर कुणाल शाह चर्चेत; FreeCharge ते CRED असा प्रेरणादायी प्रवास

मुंबई : विल्सन कॉलेजमधून फिलॉसॉफी विषयात पदवी घेतल्यानंतर मॅनेजमेंटचे शिक्षण अर्धवट सोडणाऱ्या मुंबईकर कुणाल

Mumbai Rain : जुलैमधील पावसावर मुंबईकरांचे भविष्य

पुढील तीन दिवसांमध्ये पावसाची हजेरी लागणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत (Mumbai )मंगळवारपासून पुढील तीन दिवस पाऊस

BMC : मुंबईत पाण्यावरून रान उठले

मुंबईतील रेनवॉटर हार्वेस्टींग योजनेतंर्गत सर्व इमारती, संकुलांचे ऑडीट करा मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील (Mumbai)

Lionel Messi : मेस्सीचा महाविक्रम! फिफा विश्वचषक इतिहासातील सर्वाधिक गोल करणारा खेळाडू

Lionel Messi (FIFA World Cup 2026) : अर्जेंटिनाचा (Argentina) कर्णधार लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने आपल्या कारकिर्दीतील आणखी एक सुवर्ण अध्याय

BMC News : एमआयएमचा एक नगरसेवक झाला कमी, जातप्रमाणपत्र वैधता समितीच्या निर्णयानंतर सभागृहात झाली घोषणा

मुंबई : मुंबई महापालिकेतील (BMC) प्रभाग १११मधील उबाठा नगरसेवक दिपक सावंत यांचे जातप्रमाण पत्र अवैध ठरल्याने

FIFA World Cup 2026 Lionel Messi : पेनल्टी हुकली, पण विक्रम गाठला! मेस्सीच्या दोन गोलसह अर्जेंटिनाचा विजय

Lionel Messi : 'फुटबॉलचा महानायक' GOAT लिओनेल मेस्सी (Lionel Messi) याने पुन्हा एकदा आपल्या शानदार खेळाची झलक दाखवत अर्जेंटिनाला FIFA World