पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेच्या उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार

मुंबई, दि. ४ : - पुणे व रायगड जिल्ह्यांत २१०० मेगावॉट क्षमतेचा पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी चॅम्बेरी पॉवर (ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यांची समूह कंपनी) यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला.


विधान भवन येथे यावेळी आयोजित या कार्यक्रमास जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा (विदर्भ, तापी,कोकण पाटबंधारे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महाजनको)चे व्यवस्थापकीय संचालक राधाकृष्णन बी., ईडीएफ सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुरिएक सर्वन तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


राज्य शासनाच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) धोरणानुसार २१०० मेगावॉट क्षमतेचा उदंचन जलविद्युत प्रकल्प उभारण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ऊर्जा साठवण आणि स्थिर वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.


योजनांनुसार औद्योगिक दराने सुमारे १,७६२.२१ कोटी रुपयांचा महसूल तर प्रतिवर्ष पुनर्भरणातून सुमारे १२८.३२ कोटी रुपयांचा महसूल राज्याला मिळणे अपेक्षित आहे. ऊर्जा क्षेत्रातील ही मोठी गुंतवणूक राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


प्रकल्पाचा तपशील : चॅम्बेरी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत पिंपळपाडा-सावळे उदंचन जलविद्युत प्रकल्प पुणे व रायगड जिल्ह्यांत विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १० हजार २१७ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित असून अंदाजे २,५०० रोजगार निर्मिती होणार आहे.


महाराष्ट्रातील उदंचन जलविद्युत प्रकल्प : राज्यात आतापर्यंत एकूण ५५ उदंचन जलविद्युत प्रकल्पांद्वारे ७८,२१५ मेगावॉट वीज निर्मिती अपेक्षित आहे. या माध्यमातून सुमारे ४.१७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक तर १.२८ लाख मनुष्यबळासाठी रोजगारनिर्मिती होणार आहे.

Comments
Add Comment

तब्बल २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण

मुंबई : मुंबईतील ग्रांट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीचा पुनर्विकास पूर्ण झाला असून येथील २६५ रहिवाशांना

मुंबईतील १२ प्रभाग समित्या बिनविरोध, पाच प्रभाग समित्यांमध्ये होणार निवडणूक

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौरांसह चार वैधानिक समित्यांच्या अध्यक्षपदाची निवड

पुण्याच्या इंदिरा युनिव्हर्सिटीच्या संचालकांनी मानले उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार

मुंबई: “आजवर तुमच्याबद्दल फक्त ऐकून होते, मात्र तुम्ही प्रत्यक्षात संकटाच्या वेळी मदतीला धावून येता, याची

​गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर; मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक

मुंबई : गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि अलिबाग दरम्यान धावणाऱ्या प्रवासी बोटींचे आधुनिकीकरण करून प्रवाशांना

डॉ. अभिजित चौधरी 'पीएमआरडीए'चे नवे आयुक्त

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी दोघा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, पुणे महानगर प्रदेश विकास

'ऊर्जा क्षेत्राला सक्षम करण्यासाठी कालबद्धरित्या प्रकल्पांची अंमलबजावणी करा'

मुंबई : राज्यात ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत असून जलसंपदा विभागाच्या माध्यमातून उदंचन जलविद्युत