Iran -Israel America War : इराणमधील त्या फोटोंनी जग हादरलं; ट्रम्प यांच्या पुतणीची तीव्र प्रतिक्रिया

मिनाब : अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ले सुरू केले त्याला इराणने प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आणि नव्या युद्धाला तोंड फुटले. पश्चिम आशियात नवा संघर्ष सुरू झाला. युद्धाच्या पहिल्याच दिवशी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात दक्षिण इराणमधील मिनाब येथे घडलेल्या घटनेने जगभरात खळबळ उडवली आहे. एका प्राथमिक शाळेवर झालेल्या भीषण हल्ल्यात १६५ लहान विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी या चिमुकल्यांना दफन करण्यात आल्यानंतरची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि संपूर्ण जग अस्वस्थ झाले.



जेसीबीने खोदावी लागली १६५ थडगी


मृत मुलींची संख्या मोठी असल्याने एकाच वेळी १६५ थडगी खोदावी लागली. मानवी श्रमांऐवजी जेसीबीच्या सहाय्याने थडगी खोदली गेली . उंचावरून टिपलेला फोटो व्हायरल होताच जगभरातून हजारो लोकांनी दु:ख आणि संताप व्यक्त केला. अनेक इराणी पालकांनी आपल्या निष्पाप मुलींना अखेरचा निरोप देताना टाहो फोडला.



अमेरिकेतूनही उमटली प्रतिक्रिया


या फोटोंवर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुतणी मेरी एल ट्रम्प हिने सोशल मीडियावर . “या क्रूरतेचे समर्थन करून दाखवावे,” असे आव्हान देत त्यांनी संताप व्यक्त केला.



इराणकडून अमेरिकेवर टीका


इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनीही या थडग्यांचे फोटो शेअर करत अमेरिकेवर निशाणा साधला. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नागरिकांच्या हत्येचा मुद्दा उपस्थित करत कठोर शब्दांत टीका केली आहे.



जगाचा एकच सवाल – या मुलांचा गुन्हा काय?


या घटनेनंतर इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मुद्दाम शाळांना लक्ष्य करून युद्ध करणे हे चुकीचे आहे. यात त्या निष्पाप मुलांचा काय गुन्हा हा एकच प्रश्न जग विचारत आहे.

Comments
Add Comment

Hayden Panettiere Passes Away : बालकलाकार ते हॉलीवूड स्टार! 'हिरोज' फेम अभिनेत्री हेडन पॅनेटीयरचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन

लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन

Indonesia Earthquake : इंडोनेशियाला पुन्हा भूकंपाचा धक्का; 5.7 तीव्रतेच्या भूकंपाने नागरिकांमध्ये भीती

इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या शक्तिशाली भूकंपानंतर सोमवारी सकाळी पुन्हा एकदा

Europe Heatwave 2026 : युरोपमध्ये उष्णतेचा कहर! जूनमध्ये १६ हजारांहून अधिक मृत्यू; पुन्हा हीटवेव्हचा धोका

नवी दिल्ली : युरोपमध्ये यंदा तीव्र उष्णतेने मोठे संकट निर्माण केले आहे. जून महिन्यात जवळपास आठवडाभर सुरू

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Indonesia Earthquake : इंडोनेशियात ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप; त्सुनामीचा इशारा, मोठी जीवितहानी

इंडोनेशिया : इंडोनेशियाच्या पूर्व भागातील फ्लोरेस बेटाजवळ शनिवारी पहाटे ७.७ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप (Indonesia Earthquake)

Shehbaz Sharif News : पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांची भारताला धमकी, सिंधू पाणी करारावरून पुन्हा एकदा गरळ ओकली

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आयोजित 'यादगार-ए-फतह' कार्यक्रमात बोलताना