ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने आणि आता तालिबानने नूर खान एअरबेसवर केला हल्ला

रावळपिंडी : ऑपरेशन सिंदूरमध्ये (२०२५) भारताने आणि आता अफगाणिस्तानमध्ये सत्तेत असलेल्या तालिबानने (२०२६) पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील नूर खान एअरबेसवर हल्ला केला. अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी पाकिस्तानला दणका दिला आहे. रावळपिंडीतील नूर खान एअरबेस, क्वेटा (बलुचिस्तान) येथील १२ व्या डिव्हिजनचे मुख्यालय, खैबर पख्तूनख्वा येथील मोहमंद एजन्सीमधील ख्वाजई कॅम्प आणि इतर अनेक महत्त्वाच्या पाकिस्तानी लष्करी आस्थापनांना आणि कमांड सेंटरना लक्ष्य केल्याचे अफगाणिस्तानने जाहीर केले.


पाकिस्तानने काबूल आणि बगरामला लक्ष्य करून हवाई हल्ले केले. या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून अफगाणिस्तानने पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केली. जर पुन्हा पाकिस्तानने अफगाणिस्तानमध्ये हल्ले केले अथवा अफगाणिस्तानच्या हवाई सीमेचे उल्लंघन केले तर अफगाणिस्तानकडून आतापर्यंत दिले त्यापेक्षा तीव्र प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशारा अफगाणिस्तानने पाकिस्तानला दिला आहे.


पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात फेब्रुवारी २०२६ पासून नव्याने संघर्षाला सुरुवात झाली आहे. या संघर्षात पाकिस्तानचे शेकडो सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे. तर पाकिस्तानच्या लष्करी कारवाईत ४१५ अफगाण तालिबानी लढवय्ये मारले गेले आणि ५८० हून अधिक जखमी झाले असे पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार यांनी सांगितले. किमान १८२ अफगाण चौक्या नष्ट केल्या आणि ३१ चौक्या ताब्यात घेतल्या तसेच १८५ टँक, चिलखती वाहने आणि तोफखाना नष्ट केला, अफगाणिस्तानातील ४६ ठिकाणांवर प्रभावी हवाई हल्ले केले; असेही पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री अत्ताउल्लाह तरार म्हणाले.

Comments
Add Comment

कोनेरू हम्पीची सुरक्षेच्या कारणास्तव कॅन्डिडेट्स स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली : भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी या महिन्यात सायप्रसमध्ये होणाऱ्या प्रतिष्ठित कॅन्डिडेट्स

चोरट्यांनी बँक लुटली, रोख १३.७ लाख रुपये आणि २.१ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे दागिने चोरले

पेशावर : पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरमध्ये कोहाट रोडवरील नॅशनल बँकेच्या

होर्मुजच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांवर इराणकडून २० लाख डॉलर्स शुल्क

तेहरान : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेले संकट अधिक तीव्र होत असल्याचे दिसत आहे. आता इराणने जागतिक तेल पुरवठ्यासाठी

पश्चिम आशियातील युद्धामुळे पाकिस्तान भिकेला; एका रात्रीत इंधनाचे भाव २०० रुपयांनी वाढले

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तान सरकारने आता हाय-ऑक्टेन इंधनावरील करात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला

Iran-US-Israel War : "अमेरिकेने ऊर्जा केंद्रांवर हल्ला केल्यास..."; अमेरिकेच्या धमकीला इराणचे स्पष्ट उत्तर

अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव आता अत्यंत गंभीर टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या तीन आठवड्यांपासून सुरू

Plane - Fire Truck Accident : थेट विमानानेच दिली अग्निशमन दलाच्या गाडीला धडक, अनेक जण जखमी

न्यूयॉर्कच्या ला गार्डिया विमानतळ (LaGuardia Airport) येथे सोमवारी (२३ मार्च) एक धक्कादायक अपघात घडला. लँडिंगदरम्यान एका