Nagpur Blast : काटोलमध्ये स्फोटक कारखान्यात भीषण दुर्घटना; १२ ठार, १५ जखमी

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या SBL कंपनीत १ मार्च रविवारी सकाळी सुमारे ७ वाजता भीषण स्फोट झाला. बारुद आणि डेटोनेटरसह विविध स्फोटक साहित्य तयार करणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटात १२ कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच किमान १५ जण जखमी असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



स्फोटानंतर आग; बचावकार्य वेगात :


स्फोट इतका तीव्र होता की परिसरात मोठा आवाज होऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर कारखान्याच्या परिसरात आग लागली असून अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस आणि बचाव पथकांकडून मदतकार्य सुरू आहे. दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली असून परिसरात संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.



आमदारांचा गंभीर आरोप :


काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी मात्र या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू आणि २० जण जखमी झाल्याचा दावा केला आहे. कंपनीकडून सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला. आवश्यक प्रशिक्षण आणि सुरक्षा उपाययोजना न करता कामगारांकडून काम करून घेतले जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.



वर्षभरापूर्वीही अशाच प्रकारची घटना :


याच राऊळगाव शिवारातील कोतवालबड्डी परिसरात वर्षभरापूर्वी ‘एशियन फायर वर्क्स’ या स्फोटक कंपनीतही मोठा स्फोट झाला होता. फटाक्यांची वात तयार करताना झालेल्या त्या स्फोटात चार कामगारांपैकी दोघांचा मृत्यू झाला होता, तर दोघे जखमी झाले होते.


सध्याच्या दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा औद्योगिक सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Comments
Add Comment

Jalna Murder Case : आयुष्याची नवीन सुरुवात करण्यासाठी ठरवलेला दिवसच ठरला अंतिम, पोटच्या मुलानेच केली निघृण हत्या

जालना जिल्ह्यामधील अंबड तालुक्यात एक धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. पोटच्या मुलानेच आपल्या

Pune News : मांजरी स्टेशनचा कायापालट तर रामटेकडीला मिळणार नवे ब्लॉक स्टेशन

पुणे : पुणे रेल्वे विभागाने वाढती प्रवासी गर्दी आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण लक्षात घेऊन दोन महत्त्वाचे प्रकल्प

CM Fellowship : तरुणांसाठी मंत्रालयात कामाचा थाट, पगारही जोरात! मुख्यमंत्री फेलोशिपसाठी महिना ६१,५०० रुपयांची संधी; कसा कराल अर्ज ?

मुंबई : राज्यातील कल्पक आणि उत्साही तरुणांसाठी प्रशासकीय सेवेचा अनुभव घेण्याची सुवर्णसंधी पुन्हा एकदा उपलब्ध

Minister Nitesh Rane : मत्स्यव्यवसायात महाराष्ट्र नंबर वन करणार - मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : मत्स्यव्यवसायात राज्याला देशात अग्रस्थानी नेण्यासाठी राज्य शासनाने अनेक योजना, उपक्रम सुरू केले आहेत.

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व