Iran: एकामागून एक असे २० बॉम्ब टाकत खोमेनेईचा खात्मा; थरारक दृष्य

दिल्ली: इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त हवाई हल्ल्यात मृत्यू झाला आहे. शनिवारी पहाटे खामेनेई यांच्या निवासस्थानावर २० शक्तिशाली बॉम्ब टाकण्यात आले. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामुळे इराणमधील ३६ वर्षांपासून सुरू असलेल्या खामेनेई यांच्या सत्तेचा अंत झाला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. सॅटेलाइट फोटोंमध्ये खामेनेई यांचा संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यात आधीचं त्याचं घर आणि हल्ला झाल्यानंतर त्याचं घर याची छायाचित्र आता समोर आली आहेत.


ज्यावेळी हा हल्ला झाला, तेव्हा ८६ वर्षीय खामेनेई आपल्या कार्यालयात एका महत्त्वाच्या बैठकीत व्यस्त होते. इस्रायलने या मोहिमेसाठी अत्यंत अचूक आणि शक्तिशाली बॉम्बचा वापर केला होता. जेणेकरून लक्ष्याला वाचण्याची कोणतीही संधी मिळू नये. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ'वर पोस्ट करून या वृत्ताला दुजोरा दिला. त्यानंतर इराणच्या सरकारी प्रसारमाध्यमांनीही खामेनेई यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. त्यामुळे इराणमधील खामेनेई युगाचा अंत झाला आहे.


इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रहार केला आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला अली खामेनेई यांचा त्यांच्याच घरात खात्मा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामेनेई यांच्या कंपाउंडवर एकामागून एक २० बॉम्ब डागण्यात आले. हल्ल्यापूर्वीचं आणि हल्ल्यानंतरचं भीषण दृश्य सॅटेलाइट फोटोंनी जगासमोर आणलं आहे. जिथे डौलदार इमारती होत्या, तिथे आता फक्त ढिगारा उरला आहे.


खामेनेई गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकेला, विशेषतः डोनाल्ड ट्रम्प यांना उघड आव्हान देत होते. गेल्या वर्षी त्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला झाला होता, तरीही त्यांची जिद्द कमी झाली नव्हती. मात्र, शनिवारी पहाटे इस्रायलला खामेनेई यांच्या लोकेशनची अचूक माहिती मिळाली आणि क्षणात खेळ संपला. इराणच्या मीडियाने खामेनेई 'शहीद' झाल्याचं जाहीर करत देशाला मोठा धक्का दिला आहे.


परदेशी मीडिया रिपोर्ट्सनुसार, खामेनेई आपल्या निवासस्थानी बैठकीत असल्याची खात्रीशीर माहिती इस्रायली गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला करण्यात आला. डोनाल्ड ट्रम्प यांनी या यशाबद्दल अधिकृतपणे माहिती दिली आहे. इराणमधील स्थानिक परिस्थिती आता तणावपूर्ण असून, या हल्ल्यानंतर आखाती देशांमधील युद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.




Comments
Add Comment

Israel vs Iran War Ali Khamenei Death: मोठी अपडेट, इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनींचा मृत्यू; इस्रायलच्या पंतप्रधानांनी केला दावा बेंजामिन नेतान्याहू

दिल्ली: जगाचं लक्ष लागून राहिलेल्या अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाबाबत महत्तवाची अपडेट समोर आली.

मध्यपूर्व देशांमधील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा ॲडव्हायझरी जारी

दिल्ली: मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या

अमेरिकेचा तेहरानवर हवाई हल्ला; सर्व उड्डाणे तात्काळ रद्द

तेहरान : मध्य पूर्वेत अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला असताना इराणची राजधानी तेहरान येथे हवाई

Israel-Iran Conflict : युद्ध पेटलं! इस्रायलचा इराणवर महाभयंकर हल्ला; मिसाईल हल्ल्याने इस्रायलमध्ये आणीबाणी घोषित!

जगाला हादरवून सोडणारी एक अत्यंत मोठी लष्करी कारवाई समोर आली आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील प्रदीर्घ संघर्षाची

The Epstein Files : डोनाल्ड ट्रम्पच्या आरोपांशी संबंधित रेकॉर्ड रोखल्याबद्दल एफबीआय चौकशी करणार

अमेरिकेचा न्याय विभाग जेफ्री एपस्टीन याच्याशी संबंधित असलेली काही कागदपत्रे चुकवून सार्वजनिक होण्यापासून

अफगाण सैनिकांनी पाडले पाकिस्तानचे एफ-१६ फायटर-जेट

पाकिस्तानने अफगाणिस्तानवर हवाई हल्ले केल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी युद्धाची घोषणा केली. दरम्यान, तालिबानने