मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

मुंबई : मुंबई – गोवा महामार्गावरील प्रलंबित कामांना गती देण्यात आली असून माणगाव व इंदापूर बायपासची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई – गोवा महामार्ग (एनएच-६६) मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधानपरिषदेत दिली.


विधान परिषद सदस्य निरंजन डावखरे, प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे या सदस्यांनी यासंदर्भातील प्रश्न विचारला होता.


माणगाव बायपासवरील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीकडून सुरू असून ते प्रगतीपथावर असल्याचे सांगून मंत्री भोसले म्हणाले की, माणगाव व इंदापूर बाह्यवळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठे पूल या कामांचा समावेश प्रकल्पात आहे. ही कामे जुलै २०२५ मध्ये सुरू करण्यात आली असून जुलै २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. संबंधित ठेकेदार काम न करत नसल्याने त्याच्याकडून ते काम काढून घेऊन नव्या एजन्सीला देण्यात आल्याचेही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.


कोकणातील गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी लक्षात घेता माणगाव–महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी, म्हणजे मे महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा मानस आहे. त्यामुळे माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.


चिपळूण येथील पूल मे २०२६ पर्यंत पूर्णपणे वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असून मुख्य काम पूर्णत्वास आले आहे. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाणपुलाचे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल.


गांधार पाले लेण्याजवळील रेस्ट एरिया (पार्किंग, टॉयलेट्स, कॅफेटेरिया) येथे झालेल्या तोडफोडीबाबत 16 डिसेंबर 2025 रोजी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, पूर्वी तेथे एकच सुरक्षा रक्षक असताना आता चार रक्षक नेमण्यात आले आहेत. तसेच सीसीटीव्ही बसविण्याची प्रक्रिया सुरू असून भविष्यातील सुरक्षेसाठी सर्व रेस्ट एरियांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.


गांधार लेण्यापरिसरातील रेस्ट एरियामध्ये पर्यटन विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आवश्यक सुधारणा केल्या जातील, असेही शेवटी सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Megablock : विविध अभियांत्रिकी व देखभाल कामांसाठी मुंबईत आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वेने मुंबई विभागातील तिन्ही उपनगरीय मार्गांवर रविवारी १२ एप्रिल रोजी विविध अभियांत्रिकी व देखभाल

Supreme Court : 'मतदान करणे आणि निवडणूक लढवणे हे मूलभूत अधिकार नाहीत'

नवी दिल्ली : मतदानाचा अधिकार किंवा निवडणूक लढवण्याचा अधिकार यांपैकी कोणताही अधिकार हा 'मूलभूत अधिकार' नाही, असे

Maharashtra : अवजड वाहनांमध्ये क्लीनर बंधनकारक नाही, महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मुंबई : अवजड मोटार वाहन (एचएमव्ही) चालकांना मोठा दिलासा देत महाराष्ट्र सरकारने क्लिनर ठेवण्याची अट रद्द केली आहे.

RTE साठी महाराष्ट्रातील १ लाख ५ हजार ८११ विद्यार्थ्यांची निवड

मुंबई : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार, दरवर्षीप्रमाणे २५ टक्के प्रवेश प्रक्रिया

Asha Bhosle Heart Attack : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसलेंना हृदयविकाराचा झटका, रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात

नांदोस गढी उत्खननाची मंत्री आशिष शेलार यांच्याकडून पाहणी

सिंधुदुर्ग : नांदोस येथील शिवकालीन गढीचे पुरातत्वीय उत्खनन पुरातत्व विभागातर्फे करण्यात येत असून या उत्खननात