Holi Special ST Buses : होळीसाठी धावणार एसटीच्या १९३ बस; महामंडळातर्फे विशेष सेवा जारी

मुंबई : राज्यभरात होळीच्या सणाची तयारी सुरु झालीये. देवांच्या पालख्या घरोघरी येऊ लागल्या आहेत, त्यामुळे राज्यभरातून चाकरमानी आपल्या गावी जाण्यास धावपळीत आहेत. या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने जादा बसची सोय केली आहे. मंडळाने तब्बल १९८ फेऱ्यांचे नियोजन केले असून त्यापैकी ८३ बस फुल्ल देखील झाल्या आहेत.


होळीनिमित्त प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा अंदाज लक्षात घेत २७ फेब्रुवारी ते ५ मार्च या कालावधीत एसटी महामंडळाने विशेष फेऱ्यांचे नियोजन केले आहे. होळीच्या पूर्वसंध्येला गावी जाण्याच्या ओढीने प्रवाशांची संख्या शिगेला पोहोचते. यावर विशेष करत लक्ष केंद्रीत करत २८ फेब्रुवारी, १ ,मार्चला तब्बल १५० फेऱ्या नियोजित केल्या आहेत. त्यापैकी ७० बस फुल्ल झाल्या आहेत. याशिवाय इतर दिवसांसाठी १३ बसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. एकूण फेऱ्यांपैकी १४१ फेऱ्या नियमित आरक्षणासाठी, तर ५७ फेऱ्या ग्रुप बुकिंगसाठी राखीव ठेवल्या आहेत. यामुळे कुटुंब, मित्रमंडळी किंवा संस्थात्मक प्रवास करणाऱ्या प्रवाशानांही सोयीस्कर पर्याय उपलब्ध होणार आहे.



लालपरीच्या कमाईत भर


सणासुदीच्या कालावधीत खासगी बसचे तिकीट साधारण २,५०० ते ४ हजार रुपये असते. त्यात एसटीचे तिकीट अधिक परवडणारे ठरणार आहे. त्यामुळे होळीच्या सणात वाढवलेल्या या फेऱ्यांमुळे लालपरीच्या कमाईत चांगलीच भर पडली आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबच गट आरक्षणाचे अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठांना व महिलांना ५० टक्के तिकीट दारात सवलत दिली जात आहे. ग्रुप बुकिंग केल्यामुळे चाकरमान्यांना मुंबईतून थेट गावी पोहोचता येणार आहे.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास