कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही, कार्नी सरकारची अधिकृत भूमिका

ओटावा : कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. कार्नी भारत दौऱ्यात मोदींना भेटणार आहेत. ही भेट होण्याच्या काही तास आधीच कॅनडा सरकारने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. मागील काही महिन्यांमध्ये कॅनडात खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. अज्ञातांच्या हल्ल्यांमध्ये खलिस्तान समर्थक असलेल्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणांमध्ये तपास सुरू आहे. आतापर्यंच्या तपासातून भारताचा या कारवायांमध्ये हात असल्याचा एकही ठोस पुरावा मिळालेला नाही. यामुळे कॅनडातील हिंसक घटनांशी भारताचा संबंध नाही असे कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.


कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात असता तर कार्नी सरकारने भारत दौऱ्याचे नियोजनच केले नसते. आता पंतप्रधान कार्नी भारत दौरा करत आहेत याचाच दुसरा अर्थ कॅनडातील हिंसक घटनांमध्ये भारताचा हात नाही, असे कार्नी सरकारच्या उच्चाधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. कॅनडा सरकार भारतासोबत मैत्री दृढ करण्यास इच्छुक आहे. भारत - कॅनडा यांच्यातील व्यापार वाढावा आणि दोन्ही देशांना आर्थिक लाभ व्हावा यासाठी चर्चा होणार असल्याचे संकेत कार्नी सरकारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या भारत दौऱ्याआधी राजधानी ओटावात सरकारच्यावतीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यात पत्रकार परिषदेत कॅनडा सरकारने पंतप्रधान कार्नी यांच्या भारत दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केला. भारतासोबत व्यापार आणि संरक्षणाच्या क्षेत्रातले सहकार्य वाढवण्यासाठी चर्चा करत असल्याची माहिती कार्नी सरकारने पत्रकार परिषदेत दिली.

Comments
Add Comment

Iran-US-Israel War : युद्ध संपलेले नाही,गरज पडल्यास युद्धात परतण्यास इस्त्रायल सज्ज - बेंजामिन नेतन्याहू

अमेरिका आणि इराण (Iran-US-Israel War) यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामानंतर इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू

Saudi and Iran : शस्त्रसंधीनंतर सौदी आणि इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये महत्त्वाची चर्चा

इराण, इस्रायल आणि अमेरिका (Iran-US-Israel War) यांच्यात पाकिस्तानमध्ये होणाऱ्या निर्णायक शांतता चर्चेपूर्वीच सौदी अरेबिया

Iran-US-Israel War : होर्मुज सामुद्रधुनीवर इराणचा मोठा निर्णय; इराणकडून पर्यायी समुद्री मार्ग जाहीर

पश्चिम आशियात सुरू असलेल्या तणावाच्या (Iran-US-Israel War) पार्श्वभूमीवर आता होर्मुज सामुद्रधुनी (Strait of Hormuz) संदर्भात एक मोठी

Iran-US-Israel War : बेरूतमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाहच्या प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा इस्त्रायलने केला दावा

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू झालेल्या अमेरिका - इस्त्रायल आणि इराण (Iran-US-Israel War) या युद्धात अमेरिका आणि इस्रायलने

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात

Middle East War : इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; ८९ ठार, इराणचा अमेरिकेला थेट इशारा

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी