धक्कादायक! सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी ९ जणांनी विकली किडणी

- सहा सावकारांची संपत्ती गोठवणार; मुख्यमंत्र्यांनी दिले कठोर निर्देश


मुंबई : खासगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी ९ जणांनी चक्क किडण्या विकल्याची माहिती बुधवारी (२५/२/२६) विधानसभेत देण्यात आली. यापैकी ७ जण परराज्यातील असून, दोघे पीडित महाराष्ट्रातील आहेत. यातील एक शेतकरी असल्याचेही समोर आले आहे. याप्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित सहा सावकारांची संपत्ती गोठवण्याचे आदेश दिल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.


भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबतची लक्षवेधी मांडली. यावर उत्तर देताना राज्यमंत्री भोयर म्हणाले, चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील मिथुर येथील रोशन कुडे याने खासगी सावकाराकडून ९.१५ लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यापोटी सहा आरोपींना ४८.५३ लाख रुपयांची रक्कम आणि एक एकर जमीन ही परतफेड म्हणून दिली. त्यानंतरही तगादा लावल्यानंतर संबंधित शेतकऱ्याने कंबोडिया येथे जाऊन आठ लाख रुपयांना किडनी विकून कर्ज फेडले. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास केला असता सोलापूर येथील एका मध्यस्था करवी कंबोडिया येथे किडनी विकल्याचे समोर आले आहे. यामध्ये मध्यस्थाने स्वतःसह आणि नऊ व्यक्तींच्या किडन्या कंबोडिया तसेच तामिळनाडूतील स्टार किंम्स हॉस्पिटल येथे विकल्या. या प्रकरणात सावकारी करणाऱ्या सहा आरोपींबरोबरच किडनी खरेदी विक्रीत सहभागी असणाऱ्या अन्य पाच जणांना आरोपी करण्यात आले आहे. यापैकी आठ जणांना अटक करण्यात आली असून एका आरोपीला फरार घोषित करण्यात आले आहे. सध्या त्याचा शोध सुरू आहे, अशी माहिती देण्यात आली.


त्यावर आमदार भातखळकर यांनी आरोपींना मकोका लावणार का ? असा सवाल केला. ही गुन्हेगारी प्रवृत्ती मोडून काढण्यासाठी विशेष न्यायालय शिक्षा करणार का ? सावकारांचे परवाने रद्दचे काय झाले ?, असे प्रश्न उपस्थित केले. त्याचप्रमाणे काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनीही या रॅकेटची पाळेमुळे दिल्ली आणि दक्षिण भारतापर्यंत पसरल्याची माहिती दिली. यात दिल्लीतील एका पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉक्टराचा समावेश असून, या डॉक्टराला अटक करण्याचे धाडस सरकार दाखवणार का ? असा प्रश्न उपस्थित केला.


उत्तरादाखल मंत्री भोयर म्हणाले, या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सहाजणांची संपत्ती गोठवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. आरोपी पद्मश्री असेल की अन्य कोणी असेल तरी कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी