सिंधुदुर्ग किनारपट्टी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करा - मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग, आचरा, निवती, वेंगुर्ला, मालवण आणि देवगड पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील समुद्र किनारी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कामास तातडीने गती देण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी बुधवारी दिले. मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत आयटी विभागाचे विरेंद्र सिंग तसेच सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व्हिडिओ कॉन्फरेन्सिंगद्वारे उपस्थित होते.


या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्रकिनारी भागांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स युक्त सीसीटीव्ही सर्व्हेलन्स प्रणाली उभारण्याच्या प्रस्तावाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राष्ट्रीय सुरक्षेच्या अनुषंगाने महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी आवश्यक असलेल्या प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीच्या प्रक्रियांना विलंब न लावता पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश मंत्री राणे यांनी दिले.


मंत्री राणे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक स्थिती आणि विस्तीर्ण किनारपट्टी लक्षात घेता आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे सुरक्षेची भक्कम यंत्रणा उभारणे अत्यावश्यक आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे बेकायदेशीर हालचालींवर नियंत्रण ठेवणे, सागरी गुन्ह्यांना आळा घालणे तसेच आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणे शक्य होणार आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असून, कोणतीही दिरंगाई न करता काम तातडीने सुरू करण्याचे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिले.

Comments
Add Comment

BMC : स्वच्छतेबाबत महापालिकेचा वॉर रुम; महापालिका आयुक्तांनी दिले निर्देश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत स्वच्छतेसंदर्भातील कामकाज प्रभावीपणे होत असल्याच

Gargai Water Project : उबाठाला द्यायचे नाही मुंबईकरांना अतिरक्त पाणी; गारगाई पाणी प्रकल्पाला केला विरोध

- गारगाई पाणी प्रकल्पाला महापालिकेची मंजुरी, बहुमताच्या जोरावर प्रस्ताव मंजूर मुंबई (विशेष

Metro-3 'Aqua Line' : मेट्रो-३ ‘अॅक्वा लाईन’चा प्रवाशांना मोठा दिलासा; विद्यार्थी आणि पर्यटकांसाठी सवलतीच्या दरात पास मिळणार

मुंबई : मुंबईची नवी जीवनवाहिनी ठरणाऱ्या मेट्रो-३ म्हणजेच ‘अॅक्वा लाईन’ने मुंबईकर विद्यार्थी आणि पर्यटकांना एक

Reduce Plastic : तुमचा पहिला टूथब्रश आजही पृथ्वीवर कोठेतरी पडून आहे

प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी प्रत्येक घटकाला योगदान द्यावे लागेल: राज्यपाल जिष्णु देव वर्मा देशात दरवर्षी

Green Asha Indian Ship : इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जहाज ‘ग्रीन आशा’ मुंबईत दाखल

- होर्मुझ पार करत १५ हजार टन एलपीजीचा पुरवठा मुंबई : इराण युद्धामुळे निर्माण झालेल्या ऊर्

Mumbai Local : आता बिनधास्त प्रवास करा, महिलांच्या सुरक्षेसाठी रेल्वे सुरक्षा दलानं सुरू केला 'हा' नवा उपक्रम

मुंबई : लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांना आता घाबरण्याची गरज नाही कारण चर्चगेट ते डहाणू दरम्यान लोकलनं प्रवास