गोंदिया-जबलपूर मार्ग दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी

महाराष्ट्रासह चार राज्यात मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्प


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने आज रेल्वे मंत्रालयाच्या सुमारे नऊ हजार ७२ कोटी रुपयांच्या तीन महत्त्वाच्या रेल्वे मार्गवाढीच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील गोंदिया – जबलपूर मार्ग दुहेरीकरणाचा समावेश आहे.


महाराष्ट्र, मध्य प्रदेश, बिहार आणि झारखंड या चार राज्यांतील आठ जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या या प्रकल्पांमुळे भारतीय रेल्वेच्या विद्यमान जाळ्यात सुमारे ३०७ कि.मी.ची भर पडणार आहे. यामध्ये गोंदिया-जबलपूर दुहेरीकरणासोबतच पुनारख-किऊल आणि गम्हरिया-चांडिल या मार्गांच्या तिसऱ्या आणि चौथ्या लाईनच्या कामांचा समावेश आहे.


या प्रस्तावित मल्टी-ट्रॅकिंग प्रकल्पामुळे सुमारे ५  हजार ४०७ गावे आणि जवळपास ९८ लाख लोकांचा रेल्वे संपर्क अधिक सुधारेल. रेल्वे मार्गांची वाढलेली क्षमता वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा घडवून आणेल, ज्यामुळे भारतीय रेल्वेची कार्यक्षमता आणि सेवा विश्वसनीयता वाढेल. या निर्णयामुळे रेल्वे संचालन अधिक सुलभ होईल आणि प्रवासी तसेच मालवाहतुकीतील गर्दी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नवीन भारत’ दृष्टिकोनानुसार हे प्रकल्प प्रादेशिक सर्वांगीण विकास साधण्यावर भर देतात, ज्यातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढून नागरिक आत्मनिर्भर बनतील.


‘प्रधानमंत्री गति शक्ती’ राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत तयार करण्यात आलेल्या या प्रकल्पांचा मुख्य उद्देश एकात्मिक नियोजन आणि विविध घटकांच्या सल्लामसलतीद्वारे बहुमार्गीय संपर्क (Multimodal Connectivity) आणि वाहतूक कार्यक्षमता वाढवणे हा आहे. यामुळे लोक, वस्तू आणि सेवांची अखंडित वाहतूक सुनिश्चित होईल. या क्षमता वाढीमुळे देशातील अनेक महत्त्वाच्या पर्यटन स्थळांपर्यंत रेल्वे संपर्क सुधारेल, ज्यात जबलपूरचे कचनार शिव मंदिर, बालाघाटमधील कान्हा राष्ट्रीय उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान, धुआंधार धबधबा आणि दलमा वन्यजीव अभयारण्य यांसारख्या प्रसिद्ध स्थळांचा समावेश आहे.


हे प्रकल्प कोळसा, पोलाद, लोखंड खनिज, सिमेंट, अन्नधान्य आणि खते यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचे मार्ग उपलब्ध करून देतील. या रेल्वेमार्गांच्या विस्तारामुळे दरवर्षी ५२  दशलक्ष टन (MTPA) अतिरिक्त मालवाहतूक शक्य होईल. रेल्वे हा पर्यावरणपूरक आणि ऊर्जा-कार्यक्षम पर्याय असल्याने, हे प्रकल्प देशाच्या हवामान उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सहायक ठरतील. यामुळे तेल आयातीत सुमारे ६ कोटी लिटरची बचत होईल आणि ३० कोटी किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन घटणार आहे, जे सुमारे 1कोटी वृक्ष लागवडीइतके परिणामकारक ठरेल.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात