Digital Arrest : डिजिटल अरेस्ट करण्याचा कुठलाही कायदा नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सायबर गुन्हेगारांच्या फसवणुकीला बळी पडू नका


मुंबई : "डिजिटल अटक (अरेस्ट) करण्याचा कुठलाही कायदा वा नियम नाही. डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा असून, कुणालाही तसा फोन आल्यास त्यावर कधीही विश्वास ठेवू नका. तात्काळ १९३० या क्रमांकावर तक्रार करा", असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेतून राज्यातील जनतेला केले.


प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान, आमदार अबू आझमी यांनी डिजिटल अरेस्ट आणि ऑनलाईन फसवणुकीद्वारे लूट होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला आवाहन केले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "या सभागृहाच्या माध्यमातून इथल्या सदस्यांना आणि राज्यातील सर्व नागरिकांना सांगतो की, डिजिटल अरेस्ट असा कुठला प्रकारच नाही. कायद्यात कुणालाही डिजिटली अटक करता येत नाही. त्यामुळे आपल्याला कुणी डिजिटल अरेस्टचा फोन केल्यास तो फसवा आहे, हे पाहिल्याच क्षणी समजून घ्या. त्यावर कधीही विश्वास ठेवू नका."


डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमके काय?


"डिजिटल अरेस्ट मध्ये तुम्हाला व्हिडिओ कॉल येतो आणि समोरचा व्यक्ती तुम्हाला कधी सीबीआयचा अधिकारी, तर कधी पोलीस अधिकारी असल्याचे सांगतो. तुमच्या घरी पार्सल आले असून त्यात ड्रग्स आढळले आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतो, असे तो सांगतो आणि मग २० लाख, ४० लाख रुपये मागतो. सामान्य माणूस घाबरून त्याला पैसे ट्रान्स्फर करतो. यामध्ये मोठमोठ्या अधिकाऱ्यांचीसुद्धा फसवणूक झाली आहे. हे पैसे खात्यात आल्यावर ते पुढे वेगवेगळ्या खात्यांमध्ये जातात आणि असे करत ते पैसे कुठल्यातरी विदेशातील खात्यात जातात. अनेक प्रकरणांमध्ये हे संपूर्ण ऑपरेशन विदेशातून होते," असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.





१९३० या क्रमांकावर तक्रार करा :


"कुणालाही डिजिटल अरेस्टसंदर्भात कॉल आल्यास तो फसवा आहे, हे समजा आणि त्याचक्षणी १९३० या क्रमांकावर कॉल करा. हा सायबरचा नंबर असून त्यामागे प्रचंड मोठी व्यवस्था उभी आहे. समजा लोकांनी घाबरून पैसे दिले असेल आणि लगेच १९३० या क्रमांकावर सांगितले तर गोल्डन अवरमध्ये तत्काळ हे पैसे थांबवू शकतो, अशी आपल्याकडे व्यवस्था आहे. याबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणात जनजागृती करत आहे. टीव्हीवर यासंदर्भातील जाहिराती येतात तरीही रोज कुणीतरी यात फसतो. पण डिजिटल अरेस्ट हा निव्वळ खोटेपणा आहे. कुणालाही तसा फोन आल्यास १९३० वर तक्रार करा," असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

Comments
Add Comment

SVKM : मुंबईत क्रीडा सुविधांना नवी दिशा, तीन ठिकाणी SVKM करणार विकास; जागेची मालकी सरकारचीच असल्याचे संस्थेचे स्पष्टीकरण

मुंबई : मुंबईतील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVKM) शहरातील तीन ठिकाणी

Central Railway : लोकमान्य टिळक टर्मिनस-सूबेदारगंज विशेष ट्रेन आता 'अमृत भारत एक्सप्रेस' म्हणून नियमित सेवेत; प्रवाशांना मिळणार हाय-टेक सुविधा

मुंबई : सामान्य नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे, आरामदायी आणि खिशाला पूर्णपणे परवडणारे प्रवासाचे पर्याय उपलब्ध करून

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

WhatsApp New Features Update : WhatsApp वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! Metaकडून ३ नवी सुरक्षा फीचर्स; अकाउंट हॅकिंगला बसणार आळा

मुंबई : WhatsApp वापरकर्त्यांची सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी Metaने तीन नवीन सुरक्षा अपडेट्स जाहीर केले आहेत. यामध्ये

Tripartite agreement : राज्यातील २० लाख विद्यार्थ्यांना मिळणार मोफत चष्मे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार

मुंबई : वाढत्या स्क्रीन टाईममुळे अनेक विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.