Budget Session : राज्यात एकाही डान्स बारला परवाना नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नियम मोडणाऱ्या ऑर्केस्ट्रा बारचा परवाना कायमस्वरूपी रद्द करणार


मुंबई : राज्यात सद्यस्थितीत कुणालाही 'डान्स बार'चा परवाना देण्यात आलेला नाही, केवळ 'ऑर्केस्ट्रा बार'लाच परवानगी आहे. मात्र, ऑर्केस्ट्राच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन होत असल्यास अशा बारचे परवाने केवळ निलंबित न करता, ते कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी सरकार कायद्यात सुधारणा करणार आहे. याच किंवा पुढच्या अधिवेशनात यासंदर्भातील तरतूद करण्याचा आमचा प्रयत्न असेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२४ फेब्रुवारी) केली.


विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात आमदार सुभाष देशमुख यांनी राज्यातील नियमबाह्य ऑर्केस्ट्रा बार आणि डान्स बारवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री आणि गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली. भोयर यांनी सांगितले की, न्यायालयाच्या नियमांनुसार ऑर्केस्ट्रा बारला परवाने दिले आहेत. जेथे नियमांची पायमल्ली केली जात असेल, अशा प्रकरणांची गंभीर दखल घेऊन, ज्या बारकडून तीन वेळा नियमांचे उल्लंघन होईल, त्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.


चर्चेदरम्यान आमदार भास्कर जाधव यांनी पनवेलमध्ये रात्री लेडीज बारसारखे प्रकार सुरू आहेत. दिवसा हे ढाबे आणि बार बंद दिसतात, मात्र रात्री दोन्ही बाजूंनी लेडीज बार सर्रास चालताना दिसतात, असे निदर्शनास आणून दिले. यावर सविस्तर भाष्य करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, "दिवंगत आर. आर. पाटील यांनी डान्स बार बंदीचे विधेयक आणले होते, जे सर्वोच्च न्यायालयाने निरस्त केले. त्यानंतर माझ्या कार्यकाळात पुन्हा विधेयक आणले गेले, मात्र बार मालकांनी आम्ही डान्स बार नव्हे तर ऑर्केस्ट्रा बार चालवू, असा युक्तिवाद न्यायालयात केला. त्यानुसार सरकारने ऑर्केस्ट्रा बारसाठी कठोर अटीशर्ती लागू केल्या आहेत. यामध्ये जागेचे क्षेत्रफळ, पैसे उडवण्यावर बंदी आणि नियमभंग केल्यास थेट गुन्ह्याची तरतूद आहे."


कठोर कायद्याबाबत सूतोवाच :


पनवेल भागातून येणाऱ्या तक्रारींची चौकशी करून तातडीने तपास करण्याचे आदेश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. "नियम मोडणाऱ्या बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्याबाबत आमची बैठक झाली आहे. तीन किंवा पाच वेळा उल्लंघन झाल्यास कठोर कारवाई करण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल. यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सभागृहात आणला जाईल," असेही त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Nanded News : खेळता खेळता चेंडू आणायला छतावर गेला अन् क्षणात...नांदेड हादरलं!

नांदेड : सुट्ट्यांचा आनंद घेत मित्रांसोबत क्रिकेट खेळणाऱ्या एका लहान मुलावर काळाने घाला घातल्याची धक्कादायक

LPG Gas Cylinder : मोठी बातमी! आता ५ किलोचे गॅस सिलिंडर मिळणार 'डबल'; LPG बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले

Sangli Crime News : तमाशातील वाद, दारू प्रेमसंबंधांचा शेवट; २४ तासांत सांगलीत सलग तीन खुनांनी खळबळ

सांगली : सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासांत घडलेल्या तीन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी कायदा-सुव्यवस्थेबाबत

Mumbai Metro 9 Inauguration : अखेर दहिसर-काशिगाव मेट्रो लाईन ९ चे होणार उद्घाटन; जाणून घ्या स्थानके, तिकीटाची किंमत

मुंबई : तारीख पे तारीख म्हणत आज अखेर मुंबई मेट्रो ९ ( दहिसर ते काशीगाव ) या मार्गिकेचे उदघाटन संपन्न होणार आहे.

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Ashok Kharat Case : नाशिक खरात प्रकरण: मंदिरातील देणग्या ते परदेशी दुव्यांपर्यंत SIT ची चौकशी

मुंबई : नाशिकमधील अशोक खरात प्रकरणात तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, विशेष तपास पथक (SIT) विविध अंगांनी चौकशी