Budget Session : विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी केली तालिका अध्यक्ष आणि सभापतींची घोषणा

मुंबई : विधानसभा आणि विधानपरिषद सभागृहांचे कामकाज सुरळीत सुरू ठेवण्यासाठी मंगळवारी तालिका अध्यक्ष आणि सभापतींची घोषणा करण्यात आली. अनुक्रमे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी याबाबत घोषणा केली.


विधानसभेच्या कामकाजासाठी योगेश सागर, संजय केळकर, समाधान अवताडे, दिलीप लांडे, सुनील प्रभू, चंद्रकांत नवघरे, राजू खरे, अमित झनक यांची नियुक्ती तालिका अध्यक्षपदी करण्यात आली. तर, चित्रा वाघ, कृपाल तुमाने, विक्रम काळे, राजेश राठोड, सुनील शिंदे यांची तालिका सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली.


राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार २३ फेब्रुवारी पासून सुरु झाले. सकाळी ११ वाजता राज्यपालांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाची सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्पीय सादर करतील.

Comments
Add Comment

Accident News : मिरा रोडमध्ये भरधाव वाहनाने नागरिकांना उडवलं; धडकेनंतर चालक फरार, व्हिडिओ व्हायरल

मिरा रोड:  मिरा-भाईंदर येथे भरधाव आणि बेदरकार वाहनचालकांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मिरा रोड येथील जे.पी.

Nashik Crime : वर्चस्ववादातून गोळीबार ! 32 वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

Nashik Crime : नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला खरंच राहिला आहे का असा प्रश्न नाशिकमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारीच्या

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

Ashish Shelar : Gen Z साठी मराठी चित्रपट निर्मितीत राज्य सरकार सहभागी होणार; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीतील नव्या पिढीला, विशेषतः Gen Z प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या विशेष चित्रपटाच्या

Marathi Mandatory : महाराष्ट्रात व्यावसायिक वाहनचालकांसाठी मराठी अनिवार्य; नियमांच्या अंमलबजावणीसाठी उद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

मुंबई : महाराष्ट्रात व्यावसायिक प्रवासी वाहने चालवणाऱ्या चालकांना आता व्यवहारिक मराठी भाषेचे ज्ञान असणे

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची