टीएमएस २ .०  मुळे राज्यात जबाबदार आणि पारदर्शक आरोग्य व्यवस्था निर्माण होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

टीएमएस २ .०  (ट्रांन्झॅक्शन मॅनेजमेंट सिस्टिम) प्रणालीचा आज शुभारंभ


मुंबई : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत जलद, पारदर्शक आणि रुग्णस्नेही उपचार मिळण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. राज्यात टीएमएस २ .०  प्रणालीमुळे रुग्णांकरिता पारदर्शक, जबाबदार आणि सुलभ ठरणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.


विधान भवन येथे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत राज्यातील ४  हजार ५३७ रुग्णालयांमध्ये २  हजार ३९९ मोफत उपचारांचा ऑनलाइन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला आहे. या टीएमएस २ .० प्रणालीचे कार्यान्वयन मध्यरात्रीपासून सुरू करण्यात येणार आहे.


कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर - साकोरे, राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव डॉ विनायक निपुण, सचिव ई रविंद्रन, जन आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. चव्हाण आदी उपस्थित होते.



टीएमएस २ .० प्रणाली विषयी...


या प्रणालीमुळे रुग्ण नोंदणीपासून ते उपचार पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल, पारदर्शक व ऑनलाईन होणार आहे. रुग्ण नोंदणी ऑनलाईन बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे. जलद उपचार मंजुरी प्रक्रिया व उपचार स्थितीचे डिजिटल ट्रॅकिंग, डिजिटल कृत्रिम बुद्धिमत्ता मॉनिटरिंगद्वारे तक्रारीचे निरसन केले जाणार आहे. या प्रणालीमध्ये रुग्णालय अंगीकरणाची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन व विहित मर्यादेत पूर्ण होणार आहे.


या योजनेअंतर्गत फसवणूक झाल्यास १५५३८८ , १८००२३३२०० या हेल्पलाइनलवर संपर्क साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.

Comments
Add Comment

महापालिकेत भाजपकडून छेडा,सिंह,कर्पे, दळवी, तर शिवसेनेकडून ब्रीद, सुर्वे यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती केली जाणार असून या दहा जागांसाठी

रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौरांनी घेतली मुंबईच्या महापौरांची सदिच्छा भेट

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रोमानिया – मिलिसाऊटी शहराच्या महापौर वांगले कॅमेरे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती

'गाडगेबाबांचा जीवन संदेश आचरणात आणण्याची गरज'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : गाडगे महाराजांनी आयुष्यभर सार्वजनिक स्वच्छता, अंधश्रद्धा, गोरगरीब रुग्णांची सेवा,

मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेतील रस्त्यांची गुणवत्ता तपासणार

खडी मुरमाच्या दबाईसाठी कोर कटिंग बंधनकारक! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केली नवीन

बदलापूर बीजांड विक्री रॅकेट प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

महिलांच्या अस्मितेशी खेळणाऱ्या माफियांना पायबंद घाला; IVF-सरोगसी प्रक्रियेवर कडक नियंत्रणाची मागणी- डॉ.

खंडाळा घाटात पुन्हा थरार! ज्वलनशील गॅस टँकर घसरला; काही काळ वाहतूक ठप्प

मुंबई : मागील महिन्यात मुंबई पुणे एक्स्प्रेसवेवर एका टँकरचा अपघात झाला होता, त्यातील ज्वलनशील प्रोपेलिन गॅसची