Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding: रश्मिका-विजयने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; लग्नाबद्दल...

मुंबई: रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या लग्नाच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून समाज माध्यमांमध्ये सुरू आहेत. अखेर रश्मिका आणि विजय दोघांनीही अधिकृतरित्या लग्नाबाबतची माहिती सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली आहे. चाहत्यांनी या जोडीला विरोश असे नाव दिलं होतं. याचाच उल्लेख त्यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये केला आहे.



सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली माहिती



रश्मिका आणि विजयने आपापल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लग्नाची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, "प्रियजनांनो, कोणतीही योजना आखण्यापूर्वी किंवा स्वतःसाठी काहीही निवडण्यापूर्वी, तुम्ही आधीपासूनच आमच्या सोबत होता. इतक्या प्रेमाने तुम्ही आम्हाला एक नाव दिले. तुम्ही आम्हाला 'विरोश' म्हणून संबोधले. म्हणूनच आज पूर्णपणे मनापासून आम्ही तुमच्या सन्मानार्थ आमच्या या मिलनाला एक नाव देत आहोत. 'विरोशचं लग्न' असे या सोहळ्याला नाव द्यायला आम्हाला आवडेल. इतक्या प्रेमाने आमची साथ दिल्याबद्दल धन्यवाद".



विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाचं लग्न कधी होणार आहे?



विजय आणि रश्मिकाने आपल्या पोस्टमध्ये लग्नाची तारीख सांगितलेली नाही. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार हे जोडपं २६ फेब्रुवारी २०२६ रोजी राजस्थान येथील उदयपूर शहरामध्ये लग्न करणार आहेत. लग्नसोहळ्यासाठी कपलने एक शाही महालाची निवड केली आहे, जेथे केवळ कुटुंबातील सदस्य आणि जवळचे मित्रपरिवार सहभागी होतील. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी दोघांनाही एअरपोर्टवर पाहिले गेले, ज्यावरून रश्मिका आणि विजय लग्नासाठी उदयपूरच्या दिशेनं प्रवास करत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता.

Comments
Add Comment

Mirzapur: The Movie : रिलीजपूर्वीच ‘मिर्झापूर: द मूव्ही’ चर्चेत; तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

मुंबई : प्राइम व्हिडिओची गाजलेली मालिका 'मिर्झापूर' आता 'मिर्झापूर द मूव्ही' या नावाने मोठ्या पडद्यावर प्रदर्शित

Samay Raina : इंडियाज गॉट लेटेंट २' मध्ये नक्की काय घडलं? 'त्या' विनोदावरून समय रैनावर भाजपचे आमदार संतापले

मुंबई : स्टॅन्डअप कॉमेडियन समय रैना पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ‘इंडियाज गॉट लेटंट’च्या नुकत्याच

Imran Hashmi : अभिनेता इम्रान हाश्मीला H1N1ची लागण; प्रकृती बिघडल्याने बंगळुरूचा कार्यक्रमही पुढे ढकलला

मुंबई : अभिनेता इम्रान हाश्मीला स्वाइन फ्लू अर्थात H1N1 विषाणूची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. शूटिंगच्या

Thug Sukesh Chandrasekhar : सुकेश चंद्रशेखरचे नोरा फतेहीला धमकीवजा पत्र व्हायरल; जॅकलिनबाबत मोठा दावा करत पुरावे सार्वजनिक करण्याची धमकी

२०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कारागृहात असलेला ठग सुकेश

Manoj Bajpayee : अभिनेता मनोज बाजपेयीनं महाराष्ट्रात कुठे आणि किती जमीन खरेदी केली ?

मुंबई : मुंबई का किंग कौन भिक्खू म्हात्रे या सत्या चित्रपटातील डायलॉगमुळे १९९८ मध्ये अभिनेता मनोज बाजपेयी

Kapuskonda Movie : सचिन पिळगावकर, मधुराणी गोखले यांचा 'कापूसकोंडा' येतोय २३ ऑक्टोबरला

मुंबई : माणूस आणि प्राणी यांच्यातील भावभावना, नातेसंबंधांचे धागे मनोरंजक पद्धतीने उलगडणाऱ्या "कापूसकोंडा" या