Maharashtra Unseasonal Rain: महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट; 'या' जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस

मुंबई: विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याची माहिती समोर आली आहे. नागपूर, गोंदिया आणि भंडारा परिसरात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडला. यामुळे रब्बी हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. परिणामी विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. प्राथमिक माहितीनुसार, नागपूर शहरात रविवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला. यावेळी जोरदार वारेही वाहत होते. त्यामुळे काही भागांमध्ये झाडं उन्मळून पडली. तर नागपूरच्या मनिष नगर परिसरातील अंडरपासमध्ये गुडगाभर पाणी साचले होते. त्यामुळे वाहनचालकांना याच पाण्यातून मार्ग काढावा लागला.


तर दुसरीकडे भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. भंडाऱ्यात पहाटे पाच वाजल्यापासून विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे कापणीला आलेलं चना, तुर, मुग, उडीद यासह कडधान्य आणि फुलोऱ्यावर आलेल्या भाजीपाला पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. तर, उन्हाळी भात पिकाला हा पाऊस लाभदायक ठरणारा आहे. हवामान विभागाने २३ आणि २४ फेब्रुवारी या दोन दिवसात विजेच्या कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.



गोंदियात पहाटेपासून पावसाला सुरुवात



गोंदियात सोमवारी सकाळपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसायला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटसह काही भागात हलक्या तर काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव, देवरी, सालेकसा तालुक्यात सह जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. रब्बी हंगामातील धान पिकाला पावसामुळे फायदा होऊ शकतो. तर बागायतदार शेतीसह कडधान्य पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.



रत्नागिरीतील पावसाने आंबा उत्पादकांची चिंता वाढवली



कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी अवकाळी पाऊस झाला होता. रत्नागिरीच्या काही भागात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे येथील आंबा उत्पादकांची चिंता वाढली आहे. सध्या आंब्याच्या झाडांना मोहोर आला आहे. काही ठिकाणी झाडांना फळंही लागली आहेत. मात्र, कालचा सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे मोहोर आणि ही फळं गळून पडली आहेत. त्यामुळे कोकणातील आंब्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.



लातूरमध्ये रात्रीपासून पावसाची हजेरी



मागील काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यानंतर लातूर शहर व परिसरात दिलासा देणारा पाऊस पडत आहे. मध्यरात्री सुमारे तीन वाजता शहरातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सकाळी सहा ते सातच्या सुमारास राजीव गांधी चौक, उद्योग भवन, गरुड चौक या परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत शहराच्या विविध भागांत वेगवेगळ्या वेळेला पावसाच्या सरी कोसळल्याने काही काळासाठी रस्त्यांवर पाणी साचले. मात्र या जोरदार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी