तुम्ही आरोग्याशी संबंधित माहिती AI किंवा Google ला विचारताय?, मोठं नुकसान होऊ शकतं

मुंबई: इंटरनेट आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (AI) युगात आपण आरोग्याशी संबंधित अनेक गोष्टींसाठी लोक गुगल किंवा चॅटबॉट्सवर अवलंबून राहू लागले आहेत. परंतु, साध्या डोकेदुखीपासून ते गंभीर आजारांच्या रिपोर्टपर्यंतची माहिती AI प्लॅटफॉर्मवर शेअर करणे तुमच्या अंगलट येऊ शकते. एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने यासंदर्भात दिलेला इशारा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.


काय आहे धोका?



आजकाल पोटात दुखत असेल किंवा रक्ताचा अहवाल समजून घ्यायचा असेल, तर आपण डॉक्टरकडे जाण्यापूर्वी चॅटबॉटला विचारतो. अनेकजण तर थेट एक्स-रे आणि एमआरआय रिपोर्ट एआय प्लॅटफॉर्मवर अपलोड करतात. पण, एका माजी गुप्तचर अधिकाऱ्याने (Intelligence Officer) 'X' वर शेअर केलेली पोस्ट तुमचे डोळे उघडणारी आहे. आपल्या आरोग्याची खाजगी माहिती AI ला देणे म्हणजे स्वतःला संकटात टाकण्यासारखे आहे.


जेव्हा तुम्ही तुमचा मेडिकल डेटा AI ला देता, तेव्हा तो फक्त तुमच्या आणि त्या मशीनपुरता मर्यादित राहत नाही. तो डेटा संबंधित कंपनीच्या सर्व्हरवर कायमचा सुरक्षित होतो आणि त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.



विमा कंपन्यांकडून अडवणूक



जर तुमची एखादी जुनी व्याधी किंवा अनुवांशिक आजार AI मुळे लीक झाला, तर भविष्यात विमा कंपन्या तुम्हाला पॉलिसी नाकारू शकतात किंवा तुमच्याकडून अव्वाच्या सव्वा प्रीमियम वसूल करू शकतात.



ब्लॅकमेलिंग आणि डिजिटल फ्रॉड



मेडिकल डेटा अत्यंत वैयक्तिक असतो. हा डेटा हॅकर्सच्या हाती लागल्यास त्याचा वापर मानसिक छळासाठी किंवा आर्थिक फसवणुकीसाठी केला जाऊ शकतो.



डेटा डिलिट करणे अशक्य



इंटरनेटवर एकदा गेलेली माहिती पूर्णपणे नष्ट करणे अशक्य आहे. AI कंपन्या या डेटाचा वापर त्यांच्या मॉडेल्सना 'ट्रेन' करण्यासाठी करतात, म्हणजेच तुमची माहिती त्यांच्या सिस्टीमचा कायमस्वरूपी भाग बनते.



काय काळजी घ्यावी?



तंत्रज्ञान वाईट नाही, पण त्याचा वापर करताना तारतम्य पाळणे गरजेचे आहे. AI फक्त जुन्या डेटाच्या आधारावर उत्तर देते, ते तुमच्या प्रत्यक्ष शारीरिक स्थितीची तपासणी करू शकत नाही. त्यामुळे 'स्व-उपचार' (Self-treatment) टाळा. रिपोर्ट समजून घ्यायचा असेल तर तुमच्या फॅमिली डॉक्टरशी बोला. कोणत्याही रँडम ॲप किंवा वेबसाईटवर फाईल्स टाकू नका. तुम्ही एखादे हेल्थ ॲप वापरत असाल, तर त्याच्या सेटिंगमध्ये जाऊन 'डेटा शेअरिंग' बंद करा.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Madhuri Dixit : कोण होणार करोडपतीच्या एका सीझनसाठी माधुरी घेणार इतके मानधन...

मुंबई : टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय आणि रंजक मनाला जाणारा क्विज शो म्हणजे 'कौन बनेगा करोडपती' नेहमीच

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण