विधिमंडळाच्या आवारात अजित पवारांचे स्मृतीस्थान व्हावे - विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर; मुख्यमंत्री, गटनेत्यांसमोर प्रस्ताव मांडणार

मुंबई : "दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखे थोर नेते फार कमी होतात. त्यामुळे त्यांनी ज्याप्रकारे महाराष्ट्राची सेवा केली, त्याची जाणिव पुढच्या पीढीला होण्यासाठी त्यांच्या नावाचे एक स्मृतीस्थान विधिमंडळाच्या आवारात होणे आवश्यक आहे. त्यासंदर्भात मुख्यमंत्री, गटनेते आणि बोर्डासमोर प्रस्ताव ठेवून मी निर्णय घेईन", अशी घोषणा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सोमवारी केली.


अजित पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या शोक प्रस्तावावर बोलताना नार्वेकर म्हणाले, "मला माझ्या संसदीय कार्याची पहिली इनिंग सुरु करून दिली ती अजित पवार यांनी. त्यांनी मला पहिल्यांदा विधान परिषदेत काम करायची संधी दिली. त्याआधी मावळ लोकसभेची निवडणूक लढवण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यात जरी यश मिळाले नाही, तरी तुमच्या राजकीय कारकीर्दीची ती सुरुवात असेल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अवघ्या २८ दिवसांत त्यांनी मला विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली. शब्दाला जागणारा नेता, अशी त्यांची ओळख होती. हा जसा माझा अनुभव आहे, तसाच या सभागृहातील अनेकांचा आहे", असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले.



अजितदादांनी दिली शाबासकी


- अजित पवार यांच्या आठवणी सांगताना राहुल नार्वेकर म्हणाले, "मी विधानसभा अध्यक्ष झाल्यानंतर विधान भवनाच्या सुशोभीकरणाचे काम हाती घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर दादांनी माझी प्रशंसा केलीच. पण, कुठे काय कमतरता राहिली, हे देखील आवर्जून निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे सह्याद्री अतिथिगृह हे विधिमंडळाच्या अखत्यारित येत नसले, तरी त्याच्या डागडुजीच्या कामात लक्ष घालून ते नीट करून घ्या, अशी सूचना त्यांनी केली होती".


- त्यांच्या जाण्याने केवळ राज्याची नव्हे, देशाची अपरिमित हानी झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमधील त्यांच्या कामाची प्रशंसा देशपातळीवर झालेली आहे. जीएसटी कौन्सिलमध्ये महाराष्ट्राची बाजू अजितदादा ज्या तळमळीने मांडायचे, त्याची कसर आपल्याला कायम जाणवत राहील, असेही राहुल नार्वेकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Ganesh Idol Fitness Certificate : भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय; १ टनापेक्षा जास्त वजनाच्या गणेशमूर्तींसाठी फिटनेस प्रमाणपत्र बंधनकारक

मुंबई : भुलेश्वर येथे गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर मुंबई महापालिकेने मोठ्या गणेशमूर्तींच्या

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी

Mumbai Police Eid Security : ईद-ए-मिलादच्या पार्श्वभूमीवर मुंबईत कडेकोट बंदोबस्त; १० हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी तैनात

मुंबई : ईद-ए-मिलादच्या निमित्ताने मुंबईत मोठ्या संख्येने मिरवणुका निघण्याची शक्यता असल्याने मुंबई पोलिसांनी

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून