माणसातला देव, देवातला माणूस

मनस्वीनी : पूर्णिमा शिंदे


अमरावती जिल्ह्यातील शेणगाव हे बाबांचे जन्मगाव. २३ फेब्रुवारी १८७६ या दिवशी ईश्वराने साऱ्यांचे भले व्हावे या हेतूने एक देवदूत या पृथ्वीतलावर धाडला तो म्हणजे गाडगे बाबांच्या रूपानेच. डेबूजी हे मूळ नाव. वडील बालपणीच व्यसनाने गेले. ते आई समवेत मामाच्या गावी दापूर येथे काबडकष्ट करून मोठे झाले. मामाचे मन जिंकले. सावकाराकडील मामाची शेती मोठ्या शक्ती-युक्तीने झुंजून मिळविली आणि ती मामाच्या स्वाधीन केली. सहकार्य केले. बालपणापासूनच बहादूर डेबूजी १८९२ साली विवाहबद्ध झाले. त्यांच्या पत्नीचे नाव कुंताबाई. कुंताबाई विवाहबद्ध होऊन दोन कन्यांना त्यांनी जन्म दिला. एके दिवशी एक साधू गावात आला. डेबूंना त्यांचा लळा लागला. अशातच अचानक डेबूजींच्या गैरहजेरीत तो साधू परागंधा झाला. आई, दोन मुली, पत्नी तीन महिन्यांची गरोदर सोडून डेबूजी साधूचा शोध घेण्यासाठी घराबाहेर गेले. अंगावर चिंध्या पांघरून, हातात खराटा, डोक्यावर खापराचा तुकडा, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात बांगडी, दोन पायांत दोन वेगवेगळ्या चपला. गावोगाव हिंडत, दिवसभर गावच्या गावं स्वच्छ करायची ती खराट्याने. रात्री मात्र गावच्या लोकांची मन स्वच्छ करायची ती कीर्तनाने. संसार सोडून कधी बुद्ध होऊन शांतीचा मूलमंत्र. तर कधी अभंग, कीर्तनातून ज्ञानोबांचे, तुकोबांचे साधुत्व, देवत्व आणि ममत्व, संतत्व जोडणाऱ्या हा अवलिया म्हणजे गाडगे बाबा.


समता-बंधुता, एकता, संस्कृती व श्रमसंस्कृती बाबांठाई नांदत होती. मानव कल्याण व जनजागृती सातत्याने घडत होती. सामाजिक प्रबोधन अहोरात्र करत होते. तहानलेल्यास पाणी व भुकेल्यास अन्न. बेघरांना घर, बेकारांना काम, रुग्णांना इलाज, लुळ्यापांगळ्यांना बळ, मुक्या प्राण्यांना दया द्यावी ही बाबांची शिकवण होती. संगतीला गाडगे अन् मुखात संतांची वचने! निर्मूही, निरपेक्ष, परोपकारी सेवाभावी बाबा!
माणसात देव शोधणारा संत म्हणून गाडगे बाबांची ओळख आहे.


“तीर्थी धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी” असे म्हणत.


अन्याय, अस्पृश्यता, अत्याचार, अंधश्रद्धा याचे तळमळीने उच्चाटन करीत. मूर्तिपूजा, सावकारी कर्ज, अशिक्षितपणा, अस्वच्छता, देव-देवसकी छळ, लबाडी, भांडण-तंटा यावर कीर्तन करीत. नेहमी शेतावरचे कुदळ, नांगर आहे. कुंभाराच्या भट्टीवर माती तुडव. कोणी कुष्ठरोगी दिसला की त्यास चोळून मळून आंघोळ घाल. नाव विचारले की म्हणत, मले मालूम नाही. कोणी जात विचारले की, “माणूस” म्हणत. फक्त माणूस जात! कामाचा रस्ता न रस्ता झाडूने साफ करत. पण पगार काय घेणार? दहा लाख! विनोदी बोलत, देवळाभोवती साफसफाई करत. ती स्वतः साफसफाई करत आणि कीर्तनही. कोणी विचारलं तर म्हणत की, आज रात्री कोण्या बुवाचे कीर्तन हाय? दगडाचे टाळ घेऊन देवकीनंदन गोपाळा सुरेल भजनात सारा गाव दंग होई. दुसऱ्या दिवशी उठावं, दुसरे गाव! झाडाखाली झोपावं. मिळेल ते खावं.


साऱ्यांना वाटावं. “गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा” असे हे गाडगे बाबा करम, ज्ञान लोकसंस्कृतीचे पूजक आणि खरे समाजसुधारक होते. विनोद आणि विचारांची शिंपण त्यांचे कीर्तन लोकांच्या डोळ्यांत जळजळीत अंजन घालीत. जुनाट चालीरीती, रूडीवर फटके मारीत. लोकसंवाद साधत, अनिष्ट रूढी प्रतिकार करीत. हुंडा द्यायचा नाही, व्यसन करायचं नाही, अशिक्षित राहायचे नाही, अस्वच्छ राहायचे नाही, कुणा बुवा देव पुरुषांकडे जायचे नाही, अशा पद्धतीने आयुष्यभर त्यांनी असंख्य समाजहिताची कामे केली. रंजल्या गांजल्यांची सेवा केली. श्रमप्रतिष्ठा, मानवता, संवेदनशीलता जपणारे गाडगे बाबा. २० डिसेंबर १९५६ रोजी या देवदूताचा, संत महात्म्याचा अंत झाला. आजही आपल्यात ते त्यांच्या कार्यकर्तृत्वाने, आपल्या विचारांनी जीवित आहेत. मरावे परी कीर्तीरूपी उरावे...

Comments
Add Comment

विकतची किर्ती नको

गोष्ट लहान, मोठा अर्थ-शिल्पा अष्टमकर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला प्रसिद्धी, मान-सन्मान आणि किर्ती हवी

उंदराचे बीळ!

कथा-रमेश तांबे एका गावात एक उंदीर अगदी मजेत राहात होता. त्याच्या कुटुंबात चार-पाच जण होते. पण गावात स्वच्छतेच्या

समुद्रात मोती कसे बनतात ?

विज्ञानकथा-प्रा. देवबा पाटील सुहलीला गेलेल्या मुलांच्या ज्ञानाच्या गप्पा मस्त चालू होत्या. “सागरी प्रवाह कसे

असा ऋतू

गड-किल्ले हे माझे अत्यंत आवडीचे ठिकाण. शाळेत असताना पहिल्यांदा पहिला गड पाहिला तो ‘रायगड’ तोही सहलीच्या

विश्वासघात

संस्कृतीचा गोडवा-पूर्णिमा शिंदे पुण्यातील कर्वेनगर येथे स्थायिक असलेले संध्या आणि विनोद शहा हे व्यापारी असतात.

बाळू

नक्षत्रांचे देणे- डॉ. विजया वाड बाळू माझा विद्यार्थी. अगदी भारी दांड. मी तेव्हा उदयाचलात पर्यवेक्षक होते. एका