प्राइम व्हिडिओवरील आगामी ‘सूबेदार’च्या ट्रेलरने जिंकले अनुपम खेर यांचे मन; जाणून घ्या काय म्हणाले

मुंबई : दिग्गज अभिनेते अनुपम खेर यांनी आपल्या जिवलग मित्र अनिल कपूर यांच्या आगामी ‘सूबेदार’ चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर एक अतिशय भावूक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, जग पाहण्यापूर्वी आपल्या मित्राचे काम पाहणे ही त्यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. ट्रेलर पाहून ते खूप प्रभावित झाले असून त्यांनी त्याला “अतिशय शानदार पद्धतीने बनवलेला” असे म्हटले आहे.


अनिल कपूर यांच्या बदललेल्या अंदाजाचे कौतुक करताना ते म्हणाले, “कपूर साहेब, आपण स्वतःला काय अप्रतिम री-इन्व्हेंट केले आहे!” तसेच हा ट्रेलर पाहून ते खूप प्रेरित झाल्याचेही त्यांनी नमूद केले. दिग्दर्शक Suresh Triveni यांच्या कामाचेही त्यांनी विशेष कौतुक केले आणि प्रेक्षक ही फिल्म पाहतील याची ते उत्सुकतेने वाट पाहत असल्याचे सांगितले.


‘सूबेदार’चे दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी (Suresh Triveni) यांनी केले असून, या चित्रपटाची निर्मिती विक्रम मल्होत्रा, अनिल कपूर आणि सुरेश त्रिवेणी (Vikram Malhotra, Anil Kapoor, Suresh Triveni) यांनी केली आहे. हा चित्रपट ‘ओपनिंग इमेज फिल्म्स’ने (Opening Image Films)  अनिल कपूर फिल्म अँड कम्युनिकेशन नेटवर्क (Anil Kapoor Film & Communication Network) यांच्या सहकार्याने तयार केला आहे.


या चित्रपटात अनिल कपूर आणि राधिका मदन या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तसेच सौरभ शुक्ला (Saurabh Shukla), आदित्य रावल (Aditya Rawal), फैझल मलिक (Faisal Malik) आणि मोना सिंह (Mona Singh) यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.


‘सूबेदार’चा प्रीमियर ५ मार्च रोजी विशेषतः अमेझॉन प्राइम व्हिडिओ (Amazon Prime Video) इंडिया वर होणार आहे. हा चित्रपट भारतासह जगभरातील २४० हून अधिक देशांमध्ये हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Comments
Add Comment

‘पंचायत’ला ६ वर्षे पूर्ण, प्राइम व्हिडिओने केली पाचव्या पर्वाची घोषणा

मुंबई : द वायरल फीवर (टीव्हीएफ) निर्मित ‘पंचायत’च्या पाचव्या पर्वाची निर्मिती दीपक कुमार मिश्रा आणि चंदन कुमार

रहस्य, थरार आणि दमदार स्टारकास्ट सोबत येत आहे 'सालबर्डी'

मुंबई : मराठी चित्रपट त्याच्या आशय विषयासोबतच त्याच्या उच्च निर्मितीमूल्यांसाठी सुद्धा लोकप्रिय आहे.

"देऊळ बंद २" येतोय २१ मे रोजी

मुंबई : २०१५ साली प्रदर्शित झालेल्या "देऊळ बंद" चित्रपटाला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. अध्यात्म आणि

मातृभूमी’मधील ‘चांद देख लेना’ गाण्याचा मेकिंग व्हिडीओ प्रदर्शित

मुंबई : सलमान खान फिल्म्स संगीतने सर्वांच्या आवडीच्या ‘चांद देख लेना’ या गाण्याचा एक विशेष पडद्यामागील व्हिडीओ

'मराठी माणसाच्या असंख्य आठवणींचे गाठोडे म्हणजे भारतमाता'

मुंबई : लालबाग, परळ आणि गिरणगावातील असंख्य मराठी माणसाच्या आठवणींचे एक मोठे गाठोडे घेऊन भारतमाता सिनेमागृह उभे

Bigg Boss Marathi 6 : शेवटची कॅप्टनसी कोणाला मिळणार ? प्रेक्षकांची उत्सुकता प्रचंड वाढली

मुंबई : बिग बॉस मराठी ६ सीझन यंदा अनेक गोष्टींमुळे सतत चेर्चेत आहे. आता या सीझनचे काही दिवसच शिल्लक राहिले असून बिग