पाक मिस्ट्री स्पिनर्सना रोखण्याचे 'किवीं'समोर आव्हान

कोलंबो :टी-२० विश्वचषकाच्या 'सुपर-८' फेरीचा थरार आजपासून खऱ्या अर्थाने सुरू होत असून, ग्रुप-२ मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य संघांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळणार आहे. कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांसमोर पाकिस्तानच्या जागतिक दर्जाच्या फिरकी आक्रमणाला थोपवण्याचे सर्वात मोठे आव्हान असणार आहे.


कोलंबोची खेळपट्टी पारंपरिकपणे संथ आणि फिरकीला पोषक मानली जाते. पाकिस्तानकडे सध्या उस्मान तारिक सारखा 'मिस्ट्री स्पिनर' आहे, ज्याची गोलंदाजीची शैली फलंदाजांना कोड्यात टाकत आहे. त्याला साथ देण्यासाठी अनुभवी शादाब खान, अबरार अहमद आणि मोहम्मद नवाज यांची फौज सज्ज आहे.


पाकिस्तानच्या फिरकीला उत्तर देण्यासाठी न्यूझीलंडच्या फलंदाजांनी खास तयारी केली आहे. ग्लेन फिलिप्स आणि रचिन रवींद्र हे फिरकीपटूंच्या चेंडूंवर 'स्वीप' आणि 'रिव्हर्स स्वीप'चा सराव करत आहेत. तसेच, कोलंबोच्या मैदानातील मोठ्या बाउंड्रीचा फायदा घेण्यासाठी एकेरी-दुहेरी धावांवर भर देऊन धावगती कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.


पाकिस्तानचा माजी कर्णधार बाबर आझम सध्या खराब फॉर्ममध्ये असून त्याने ४ सामन्यात केवळ ६६ धावा केल्या आहेत. न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर त्याला स्वतःला सिद्ध करावे लागेल. पॉवरप्लेमध्ये फिन ॲलनने आक्रमक सुरुवात केल्यास पाकिस्तानच्या फिरकीपटूंवर दडपण निर्माण होऊ शकते. तसेच या विश्वचषकात आतापर्यंत २२० धावा करणारा फरहान हा पाकिस्तानचा सर्वात धोकादायक फलंदाज ठरू शकतो.


सामन्याचा तपशील: तारीख: २१ फेब्रुवारी २०२६ (शनिवार), ठिकाण: आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या