ऑस्ट्रेलिया विरुद्धची टी ट्वेंटी मालिका भारताने २-१ अशी जिंकली, सिडनी आणि अॅडलेडमध्ये भारताचा विजय

अॅडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघांदरम्यान तीन सामन्यांची टी ट्वेंटी मालिका झाली. ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली. भारताने सिडनीत झालेला पहिला सामना पावसाच्या व्यत्ययानंतर डडकर्थ लुईस नियमानुसार २१ धावांनी जिंकला. यानंतर ऑस्ट्रेलियाने मनुका ओव्हल येथे झालेला सामना १९ धावांनी जिंकला. निर्णायक असलेला अॅडलेड ओव्हल येथील सामना भारताने १७ धावांनी जिंकला.


अॅडलेड ओव्हल येथे झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारताने २० षटकांत सहा बाद १७६ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २० षटकांत नऊ बाद १५९ धावा करणेच जमले. भारताने सामन्यात १७ धावांनी बाजी मारत तीन टी ट्वेंटी सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. अॅडलेड ओव्हल येथील सामन्यात भारताची स्मृती मानधना सामनावीर झाली. स्मृतीनं ५५ चेंडूत ३ षटकार आणि ८ चौकार मारत ८२ धावांची खेळी केली. स्मृतीला अ‍ॅनाबेल सदरलँडच्या चेंडूवर अ‍ॅशले गार्डनरने झेलबाद केले.


प्रथम फलंदाजी करताना भारताची सुरुवात अडखळत झाली होती. शेफाली वर्मा (७) स्वस्तात बाद झाली. मात्र, त्यानंतर स्मृती मानधनाने (८२ धावा, ५५ चेंडू) आणि जेमिमा रॉड्रिग्जने (५९ धावा, ४६ चेंडू) दुसऱ्या विकेटसाठी १४० धावांची अभूतपूर्व भागीदारी केली. स्मृतीने आपल्या खेळीत ८ चौकार आणि ३ उत्तुंग षटकार खेचले, तर रिचा घोषने ७ चेंडूत १८ धावांची वेगवान खेळी केल्यामुळे भारताने २० षटकांत १७६/६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.


१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. भारताच्या श्रेयांका पाटीलने भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. तिने एलीस पेरीसारख्या दिग्गज खेळाडूला अवघ्या १ धावेवर बाद केले. ऑस्ट्रेलियाकडून ॲशले गार्डनरने सर्वाधिक ५७ धावा केल्या, पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळाली नाही. श्रेयांका पाटील आणि श्री चरणी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला लगाम घातला. अरुंधती रेड्डीनेही २ महत्त्वाचे बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा डाव २० षटकांत १५९/९ वर मर्यादित राहिला.


जेमिमाहचा विक्रम


जेमिमाहने हे अर्धशतक करताना ११८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांत २५०० धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारी ती भारताची चौथी खेळाडू आहे. तिच्याआधी स्मृती मानधना (४२३१ धावा), हरमनप्रीत कौर (३८२२ धावा) आणि शफाली वर्मा (२५१९ धावा) यांनी हा टप्पा पार केला आहे.


एलिस पेरीची अष्टपैलू खेळी


ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू एलिस पेरीसाठी हा ३५० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. ती ३५० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणारी ऑस्ट्रेलियाची पहिली खेळाडू आहे. तसेच एकूण तिसरी खेळाडू आहे. तिच्याआधी भारताची हरमनप्रीत कौर आणि न्यूझीलंडची सुझी बेट्स यांनी हा विक्रम केला आहे. हरमनप्रीतने ३५७ सामने खेळले, तर सुझी बेट्सने ३५५ सामने खेळले आहेत.


सामन्याचे संक्षिप्त धावफलक:
भारत महिला: १७६/६ (स्मृती मानधना ८२, जेमिमा रॉड्रिग्ज ५९; सदरलँड २/३४)
ऑस्ट्रेलिया महिला: १५९/९ (ॲशले गार्डनर ५७, फोबी लिचफिल्ड २६; श्रेयांका पाटील ३/२२, श्री चरणी ३/३२)
निकाल: भारत १७ धावांनी विजयी.

Comments
Add Comment

IPL 2026 Sunil Gavaskar : सुनील गावस्करांची अनफिट क्रिकेटपटूंवर टीका

मुंबई : भारताचे महान फलंदाज सुनील गावस्कर यांनी पुन्

IPL 2026 : गुवाहाटीवर पावसाचे सावट! MI vs RR थरार रंगणार की सामना होणार रद्द?

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल