सुपर एट फेरीतला पहिलाच सामना पावसामुळे रद्द

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंडी वर्ल्डकप २०२६ च्या सुपर एट फेरीतला पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. न्यूझीलंड (Y2) आणि पाकिस्तान (Y3) यांच्यात कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे हा सामना होणार होता. पावसामुळे हा सामना रद्द झाला आणि नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला आहे.


यंदाच्या वर्ल्डकपमधील पावसामुळे रद्द झालेला हा दुसरा सामना आहे. याआधी १७ फेब्रुवारी रोजी आयर्लंड - झिम्बाब्वे हा साखळी सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यावेळीही नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण बहाल करण्यात आला होता. आता रविवार २२ फेब्रुवारी रोजी सुपर एट फेरीचे दोन सामने होणार आहेत. पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम येथे इंग्लंड (Y1) - श्रीलंका (Y4) हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी तीन वाजता सुरू होणार आहे. तसेच अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियम येथे भारत (X1) - दक्षिण आफ्रिका (X4) हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे.

Comments
Add Comment

The Hundred Auction : काव्या मारनच्या 'त्या' कृतीवर बीसीसीआयची पहिली प्रतिक्रिया

काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायजर्स लीड्स या टीमनं इंग्लंड येथे होणाऱ्या द हंड्रेड २०२६ च्या ऑक्शनमध्ये

आयपीएल २०२६ : हर्षित राणा दुखपातीमुळे संपूर्ण स्पर्धेला मुकणार

नवी दिल्ली : आयपीएल २०२६ च्या आधी कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. हर्षित राणा आयपीएलमधून बाहेर पडला

सीएसकेविरोधात सन टीव्ही नेटवर्कची मद्रास उच्च न्यायालयात धाव

रजनीकांत यांच्या गाण्यांचा आणि संवादांचा अनधिकृत वापर केल्याचा दावा नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा

आयपीएल सुरू होण्यापूर्वीच आरसीबीचा 'स्टार' गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर?

जोश हेझलवूड ‘अॅशेस’ मालिकेलाही मुकला होता बंगळूरु : आयपीएल २०२६ च्या रणसंग्रामाला २८ मार्चपासून सुरुवात होत

Team India Schedule : विश्वचषकाच्या विजयानंतर पुढील कामगिरीसाठी भारतीय संघ सज्ज

- जाणून घ्या भारतीय संघाचे नवीन व्यस्त वेळापत्रक २०२६ चा आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक जिंकत भारतीय संघाने जागतिक

ICC Men's T20 World Cup 2026 : टी-२० विश्वचषकामुळे आयसीसीची कोट्यवधींची कमाई

मुंबई : ICC Men's T20 World Cup २०२६ स्पर्धा केवळ क्रिकेटप्रेमींसाठीच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही मोठी ठरली आहे. या स्पर्धेतून