चक्क व्हॉट्सअ‍ॅप वरून बारावीचा पेपर मुलांपर्यंत पोहोचला? नागपुरातील धक्कादायक प्रकार समोर

मुंबई : राज्यात सध्या परीक्षेचे वारे वाहत आहेत, दहावी आणि बारावीची मुले आपल्या आयुष्यातील निर्णायक परीक्षा देत आहेत. अशातच नागपूर येथून बारावीचे दोन पेपर फुटल्याची धक्कदायक बातमी समोर आली आहे.



नेमकं घडल काय ?


नागपूरमधील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरू असताना एका विद्यार्थिनीची हालचाल संशयास्पद आढळली. ती वारंवार प्रसाधनगृहात जात असल्याने केंद्रातील परीक्षकांनी तिची झडती घेतली. तपासादरम्यान तिच्याकडून मोबाईल जप्त करण्यात आला.


मोबाईल तपासल्यावर एका व्हॉट्सअ‍ॅपच्या गटामध्ये प्रश्नपत्रिकेतील मजकूर परीक्षा सुरू होण्यापूर्वीच शेअर झाल्याचे आढळून आले. यात रसायनशात्र आणि भौतिकशास्त्र या पेपरचा समावेश होता. या गटात एकूण १५ विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.



शिक्षकावर गंभीर आरोप


चौकशीत दोन विद्यार्थिनींनी एका खासगी शिकवणीतील शिक्षकाने पैशांच्या मोबदल्यात प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिल्याचा आरोप केल्याचे समजते. संबंधित गटातील इतर १३ विद्यार्थी शहरातील विविध परीक्षा केंद्रांवर परीक्षा देत होते.



गुन्हा नोंद, तपास सुरू


केंद्रप्रमुखांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून सखोल तपास सुरू आहे. मोबाईलमधील मेसेज , कॉल रेकॉर्ड आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी