Ravindra Chavan : वैचारिक दिवाळखोर नेतृत्व असल्यामुळे काँग्रेस देशविरोधी झाली

- काँग्रेसच्या देशविरोधी मानसिकतेविरोधात भाजयुमोचे मुंबईत आंदोलन


मुंबई : 'AI इम्पॅक्ट समिट' मधून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करणा-या नव भारताच्या सामर्थ्याचे दर्शन घडत असताना दुसरीकडे काँग्रेसचे 'शहजादे' वैचारिक दिवाळखोरी आणि नकारात्मकतेपायी देशाला बदनाम करण्याचा कट रचत आहेत. 'ए आय इम्पॅक्ट समिट' या जगातील सर्वात मोठ्या समिटमध्ये भारताला मिळणा-या सन्मानाला गालबोट लावण्यासाठी राहुल गांधींनी आपल्या गुंडांना मैदानात उतरवले. भारताच्या प्रतिमेला कलंक लावण्याचे हे कृत्य लांछनास्पद आहे. राहुल गांधींमुळे काँग्रेस आता AI अर्थात Anti-India (भारत विरोधी) झाली आहे, असा हल्लाबोल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केला.


भारताची चहुबाजूने होत असलेली प्रगती न पाहवून असुयेपोटी विकसित भारताच्या निर्मितीमध्ये अडथळे आणून अराजक माजवण्याचे काँग्रेसचे कारस्थान असून ते कधीही यशस्वी होणार नाही असेही त्यांनी निक्षून सांगितले.





काँग्रेसच्या या देशविरोधी व लाजिरवाण्या कृत्याचा निषेध मुंबई भाजयुमोतर्फे (भाजप युवा मोर्चा) करण्यात आला. भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय, टिळक भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. संपूर्ण जग भारताकडे (AI) क्षेत्रातील जागतिक नेतृत्व म्हणून पाहत असताना, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र असलेले टी-शर्ट उतरवून “PM is Compromised” तसेच भारत अमेरिका व्यापार करारासंदर्भातील घोषणा देत कार्यक्रमात अराजक निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न हीन असून भाजपा त्याचा धिक्कार करते असे भाजयुमो च्या कार्यकर्त्यांनी म्हटले.



भारताची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही :


यावेळी भाजयुमो मुंबईचे अध्यक्ष व नगरसेवक तेजिंदर सिंह तिवाना म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय मंचावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली ही कृती अत्यंत निंदनीय आहे. भारताची प्रगती काँग्रेसला सहन होत नाही म्हणूनच अशा प्रकारच्या कृतीतून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकता दाखवून दिली. काँग्रेस पक्षाचे हे वर्तन असभ्य, घोर निंदनीय असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधानांचा अपमान करून आंतरराष्ट्रीय स्तरावर गोंधळ घालणे हे केवळ लोकशाहीच्या मूल्यांना धक्का देणारे नसून देशाच्या प्रगतीवर आणि युवकांच्या भवितव्यावर आघात करणारे आहे. काँग्रेस पक्षाने तात्काळ माफी मागावी व संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.



विकासाच्या मार्गातील कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही :


यावेळी भाजयुमो मुंबईचे महामंत्री दीपक सिंह म्हणाले की, काँग्रेस पक्ष आता पंतप्रधानांचा विरोध करता करता देशाचाच विरोध करू लागला आहे. युवा भारत आता जागृत झाला असून विकासाच्या मार्गातील कोणतीही अडचण सहन केली जाणार नाही. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत AI, तंत्रज्ञान व आत्मनिर्भरतेच्या क्षेत्रात अग्रस्थानी पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Radhakrishna Vikhe Patil : मराठा समाजाच्या मागण्यांवर शासन सकारात्मक; प्रलंबित विषयांवर तातडीने कार्यवाहीचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निर्देश

मुंबई : मराठा समाजाच्या विविध मागण्यांबाबत (Maratha Community's Demands) राज्य शासन सकारात्मक असून, विविध प्रशासकीय विभागांकडे

Maharashtra Government : बागणीतील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा प्रश्न मार्गी लागणार; नियमानुकूलतेसाठी शासनाची परवानगी

मुंबई : सांगली जिल्ह्यातील बागणी गावातील ९८ घरांच्या अतिक्रमणाचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न आता

Bank Holiday Today : आज देशातील 'या' राज्यांमध्ये बँका बंद; RBI Holiday List तपासा

नवी दिल्ली : बँकेच्या शाखेत जाऊन महत्त्वाचे काम करण्याचा विचार करत असाल, तर आधी आज बँका सुरू आहेत की बंद हे तपासून

MPSC Exam : औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; आता फेरपरीक्षा होणार, उमेदवारांना पुन्हा अर्जाची गरज नाही

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक, गट-ब पदासाठीची भरती प्रक्रिया रद्द

US Military Plane : अमेरिकेचं लष्करी विमान थेट रशियात उतरलं; मॉस्कोतील लँडिंगने खळबळ

मॉस्को : रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि रशियामधील संबंध अत्यंत संवेदनशील असताना,

BWF world rankings : बीडब्ल्यूएफ जागतिक क्रमवारीत त्रिशा आणि गायत्रीची मोठी झेप

नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या बॅडमिंटन विश्वचॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकल्यानंतर, भारतीय महिला दुहेरी