कंत्राटदार नियुक्त कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी करा; भाजपच्या नगरसेविका सातम यांची महापौर,आयुक्तांकडे मागणी

बांग्लादेशींचा शोध महापालिकेच्या प्रकल्प कामांपासून


मुंबई : मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यापासून बांग्लादेशी मुस्लिमांविरोधातील मोहिम तीव्र करण्यात आली आहे. आता भाजपने आपला मोर्चा महापालिकेच्या कामांमधील कंत्राटदार नियुक्त कामगारांकडे वळवला. भाजपच्या गोरेगाव येथील नगरसेविका प्रिती सातम यांनी,मुंबई महापालिकेच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या रस्ते सिमेंट काँक्रिटीकरणसह विविध नागरी सेवा आणि पायाभूत प्रकल्प कामातील कामगारांची ओळख पटवण्यासाठी कागदपत्रांची पडताळणी करण्याची मागणी मुंबईच्या महापौर रितू तावडे आणि महापालिका आयुक्त डॉ भूषण गगराणी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या घरापासून आता भाजपने बांग्लादेशींचा शोध घेण्याचा प्रयत्न सरु केला आहे.


मुंबई महापालिकेच्या विविध नागरी सेवा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये जी कंत्राट कामे देण्यात आली आहेत. त्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगार हा बांगलादेशी मुस्लिम तर नाही ना? हे शोधून काढण्यासाठी प्रत्येक कंत्राटदाराने नियुक्त केलेल्या कामगाराची ओळख पटवण्याचा दृष्टिकोनातून त्या कामगारांच्या कागदपत्राची पडताळणी करणे आवश्यक आहे.


त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रस्त्याच्या कंत्राटदारांकडे काम करीत असलेल्या सर्व कामगारांची ओळख व तपासणी करण्यात यावी. यात पश्चिम बंगालमधील मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर दक्षिण या तिन जिल्ह्यामधून वितरीत केलेल्या आधार कार्ड धारक कामगारांची सखोल चौकशी करण्यात यावी. आणि ते बांगलादेशी मुस्लीम आहेत की नाही याची चाचपणी तथा पडताळणी करावी अशी त्यांनी निवेदनाद्वारे महापौर आणि आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.


अशाप्रकारच्या मोहिमेमुळे महापालिकेच्या प्रकल्प कामांमधील कामगार हे कुठल्या राज्यातून आलेले आहेत? याची माहिती विभागीय स्तरावर महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधींनाही करून देणे शक्य होईल. तरी आपण या तक्रारीच्या अनुषंगाने महापालिका प्रशासनाला आणि पर्यायाने पोलिस प्रशासनाला निर्देश द्यावेत अशी विनंती केली आहे.


याबाबत माध्यमांशी बोलतांना प्रिती सातम यांनी माझ्या प्रभाग क्रमांक ५२ मधील साई मार्ग रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण सुरू आहे. या रस्ते कामामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या कामगारांकडून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांशी गैरवर्तन केले जात असल्याच्या तक्रारी मला प्राप्त झाल्या होत्या. या अनुषंगाने,मी या रस्त्याच्या कामाची पाहणी करताना, संबंधित कंत्राटदाराला अशा नियुक्त कामगारांची नावे आणि त्यांचे कागदपत्रे मागण्याचा प्रयत्न केला. परंतु ते उपलब्ध होऊ शकले नाहीत. याच रस्ते कामात एक सलीम नावाचा कामगार होता. आणि तीच व्यक्ती महिलांशी गैरवर्तन करत होती, असे माझ्या निदर्शनास आले. या घटनेकडे पाहिल्यानंतर ही समस्या केवळ गोरेगाव पूर्व गोकुळधाम मधील साई मार्ग रस्त्याच्या कंत्राट कामापुरती मर्यादित नसून संपूर्ण मुंबईमध्ये अशा प्रकारे रस्ते कंत्राट आणि विविध नागरी सेवा तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये कंत्राटदार नियुक्त कामगारांच्या बाबतीत आहे, असे मला स्पष्ट जाणवले. त्या अनुषंगाने महापौर आणि आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. या निवेदनाद्वारे मुंबईतील महापालिकेच्या विविध कंत्राट कामांमध्ये मालदा, मुर्शिदाबाद, दिनजापूर उत्तर -दक्षिण या तिन जिल्ह्यातील बांगलादेशी मुस्लिम मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे या बांगलादेशी मुस्लिम कामगारांच्या शोध घेणे, त्यांना हुडकून काढणे हे देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे असल्याने कंत्राट नियुक्त कामगारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांची ओळख पटवण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Chakan-Talegaon Industrial Belt : चाकण-तळेगाव औद्योगिक पट्ट्याचा कायापालट होणार? खड्ड्यांसाठी प्री-कास्ट, जिओ पॉलिमर टेक्नो पॅचचा वापर

मुंबई : चाकण-तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील उद्योग आणि स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना

BJP Yuva Morcha : ‘वंदे मातरम्’च्या अवमानाच्या निषेधार्थ भाजयुमो मुंबईचे जोरदार आंदोलन

मुंबई : १५ ऑगस्ट रोजी झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी

Maharashtra New Doctors Appointed : राज्यात १,४४० डॉक्टरांची लवकरच नियुक्ती - आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

- आरोग्यमंत्र्यांनी साधला सहा लाखाहून अधिक नागरिकांची जनसंवाद मुंबई : राज्यात उपलब्ध झालेल्या १,४४० डॉक्टरांची

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे