‘भूत बंगला’मध्ये अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार मिथिला पालकर; कोणती भूमिका साकारणार?

मिथिला पालकर साकारणार अक्षय कुमारची बहीण; ‘भूत बंगला’मध्ये खास भूमिका


मुंबई : ‘भूत बंगला’ हा 2026 मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक मानला जात आहे. यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे बॉलिवूडची ‘ओजी’ जोडी — अक्षय कुमार आणि प्रियदर्शन — यांची तब्बल १६ वर्षांनंतर होणारी दमदार पुनरागमन. बालाजी मोशन पिचर्सच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाने या जोडीच्या आयकॉनिक कॉमेडी चित्रपटांवर वाढलेल्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण केली आहे. त्यांच्या खास विनोदशैलीचा आणि खळखळून हसवणाऱ्या जादूचा अनुभव पुन्हा मोठ्या पडद्यावर घेण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत.


या प्रतिक्षेत आणखी भर घालत अक्षय कुमार यांनी नुकतेच चित्रपटाच्या कलाकारांमध्ये एका नव्या नावाची भर घातली आहे — मिथीला पालकर . अक्षय यांनी सांगितले की, मिथिला या चित्रपटात त्यांच्या बहिणीची भूमिका साकारणार आहेत. या फ्रेश कास्टिंगमुळे कथेत एक नवा ट्विस्ट आला असून, आता चाहत्यांना या दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री पाहण्याची उत्सुकता लागली आहे.


https://www.instagram.com/p/DU8WkVyiLj_/?igsh=MWZnN3lseXI1ZHMyMw==


अक्षय कुमार म्हणाले, “मिथिलाने तिचा प्रवास इंटरनेटपासून सुरू केला आणि आज ती अनेक चित्रपटांमध्ये काम करत आहे. आणि लवकरच ती एका अशा अभिनेत्यासोबत दिसणार आहे ज्याला मी खूप चांगले ओळखतो — ओळखा पाहू कोण? मी स्वतः! ‘भूत बंगला’मध्ये मिथिला ‘भूत’ नाही, तर माझ्या बहिणीची भूमिका साकारणार आहे.”


चाहत्यांमध्ये ‘भूत बंगला’बद्दल प्रचंड उत्साह आहे. हा चित्रपट केवळ अक्षय आणि प्रियदर्शन यांच्या जोडीचे पुनरागमनच नाही, तर एक परिपूर्ण फॅमिली एंटरटेनर ठरणार आहे. यात भरपूर विनोद, मजेशीर गोंधळ आणि भावनिक क्षणांचा संगम पाहायला मिळणार आहे. प्रेक्षकांना अक्षय कुमार त्यांचा जुना अंदाज आणि जबरदस्त कॉमिक टायमिंगसह पाहण्याची अपेक्षा आहे, तर प्रियदर्शन यांचा खास देसी टच पुन्हा अनुभवायला मिळणार आहे.


बालाजी मोशन पिचर्स आणि केप ऑफ गुड फिल्म्स  यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटात अक्षय कुमार यांच्यासोबत वामिका , परेश रावल , तब्बू आणि राजपाल यादव  यांसारखे दिग्गज कलाकारही झळकणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते अक्षय कुमार, शोभा कपूर आणि एकता कपूर आहेत. तयार राहा — ‘भूत बंगला’ १० एप्रिल २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिनेमागृहांत येणार आहे!

Comments
Add Comment

Madhuri Dixit : लवकरच...! सोनी मराठी वाहिनीवरील 'कोण होणार करोडपती' चे सूत्रसंचालन करणार अभिनेत्री माधुरी दीक्षित

मुंबई : मराठी मनोरंजनविश्वात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. सोनी मराठी वाहिनी आणि Sony LIV प्रेक्षकांचा ज्ञानावर

Sara Tendulkar : मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये हवाय असा गुण... सचिन तेंडुलकरची लेक सारा तेंडुलकरचा मोठा खुलासा!

भारतीय क्रिकेटचा देव मानले जाणारे सचिन तेंडुलकर यांची लाडकी लेक सारा तेंडुलकर ही नेहमीच चाहत्यांच्या आणि सोशल

Govinda On Salman Khan: 'पाटर्नर, तू हिरोसारखा दिसत नाहीस...' गोविंदाचं 'ते' वक्तव्य अन् सलमान खानचं नशीब बदललं

बॉलिवूड अभिनेता गोविंदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चेत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने

Dil Chahta Hai completes 25 years : तरुणाईला वेड लावणारा तो एव्हरग्रीन सिनेमा आणि आजही कायम असलेली 'त्या' गाण्याची क्रेझ!

बॉलीवूडमध्ये काही चित्रपट असे असतात, जे केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता प्रेक्षकांच्या आयुष्याचा आणि

AR Rahman Son Accident : प्रसिध्द संगीतकार ए.आर. रहमान यांच्या मुलाचा कार अपघात; थोडक्यात बचावला आमीन

चेन्नई : प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान (A R Rahman) यांचा मुलगा आणि गायक ए.आर. आमीन (A R Ameen) याचा कार अपघात झाल्याची धक्कादायक

Dashmi Movie Poster Launch : अन्यायाविरुद्ध उठणार ‘दशमी’ची गर्जना! रहस्य, संघर्ष आणि स्त्रीशक्तीची कहाणी घेऊन मराठी चित्रपटाची दमदार एंट्री

मुंबई : भारतीय संस्कृतीत विजयादशमी म्हणजे केवळ सण नाही, तर अन्यायावर न्यायाचा, अधर्मावर धर्माचा आणि दुष्ट