झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही उडवली दाणादाण

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकप स्पर्धेत झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियानंतर श्रीलंकेचेही दाणादाण उडवली. सुपर ८ फेरीसाठी आधीच पात्र झालेल्या झिम्बाब्वेने श्रीलंकेविरुद्धचा सामना सहा विकेट राखून जिंकला. आता झिम्बाब्वे ब गटात सर्वोच्चस्थानी आहे. ब गटातून अनुक्रमे झिम्बाब्वे आणि श्रीलंका हे दोन संघ पात्र झाले आहेत. आजच्या सामन्यामुळे फक्त त्यांच्या अंतिम क्रमवारीवर शिक्कामोर्तब होण्यास मदत झाली आहे.


झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांनी २० षटकांत सात बाद १७८ धावा केल्या. धावांचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेने १९.३ षटकांत चार बाद १८२ धावा करत सहा विकेट राखून सामना जिंकला. झिम्बाब्वेचा कर्णधार असलेल्या सिकंदर रझाने २६ चेंडूत ४५ धावा केल्या. यात ४ षटकार आणि २ चौकारांचा समावेश होता. तोच या सामन्याचा सामनावीर झाला. झिम्बाब्वेकडून ब्रायन बेनेटने नाबाद ६३, तदिवानाशे मारुमणीने ३४, रायन बर्लने २३, सिकंदर रझाने ४५, ताशिंगा मुसेकिवाने १, टोनी मुनयोंगाने नाबाद ८ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या दुषण हेमंथने २ तर डुनिथ वेलागे आणि दासुन शनाकाने प्रत्येकी एक विकेट घेतली.


याआधी प्रथम फलंदाजी करतेवेळी श्रीलंकेकडून पथुम निस्सांकाने ६२, कुसल परेराने २२, कुसल मेंडिसने १४, पवन रथनायकेने ४४, कामिंडू मेंडिसने ७, दासुन शनाकाने ६, डुनिथ वेलागेने नाबाद १५, दुषण हेमंथने शून्य, महेश थीकशनने नाबाद शून्य धावांचे योगदान दिले. झिम्बाब्वेकडून ग्रॅमी क्रेमर, ब्लेसिंग मुजराबानी, ब्रॅड इव्हान्स या तिघांनी प्रत्येकी दोन तर रायन बर्लने एक विकेट घेतली.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या