Pune Crime: पुणे पोलिसांच्या सर्च मोहिमेला मोठे यश; ११ बांगलादेशी महिलांना अटक

पुणे: पुणे शहरातील बुधवार पेठ परिसरात पोलिसांनी बुधवार १८ फेब्रुवारीच्या रात्री विशेष सर्च मोहीम राबवत मोठी कारवाई केली. या मोहिमेदरम्यान ११ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


बुधवार पेठ परिसरात सुरू असलेल्या अवैध हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी रात्री सर्च ऑपरेशन सुरू केले होते. याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेल्या महिला बांगलादेशी नागरिक असून त्या बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


तपासादरम्यान त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याचेही प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्या नागरिकत्वाची पडताळणी आणि कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. संबंधित प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.


गेल्या काही महिन्यांपासून बुधवार पेठेत सुरू असलेल्या अवैध हालचालींवर पोलीस लक्ष ठेऊन होते. अखेर १८ फेब्रुवारीच्या सर्च ऑपरेशनमध्ये त्यांच्या हाती मोठे यश लागले आहे.


या भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असतात अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या ११ बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितले. आम्ही एकूण २२ महिलांवर कारवाई केली त्यातील ११ महिला या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.


पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. खडक पोलीसांनी ११ बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल झाले. अमितेश कुमार यांनी स्वतः या कारवाईचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

Chhatrapati Sambhajinagar Crime : थरारक! छत्रपती संभाजीनगरमध्ये भरदिवसा प्रेयसीची गळा चिरून हत्या; पेट्रोल पंपावरील घटनेने जिल्हा हादरला

छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील करमाड परिसरात आज दुपारी माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना घडली. एका

Minister Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून..... निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ३ कोटी ३८ लाखांच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाला मंजुरी

निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्रास मिळणार सुसज्ज विस्तारीत इमारत.... येवला : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व

Nitesh Rane : 'हिरव्या सापांना ठेवण्याची गरज, महाराष्ट्र जिहादमुक्त करणारच!'; नाशिकच्या 'कॉर्पोरेट जिहाद'वरून मंत्री नितेश राणे आक्रमक

पाकिस्तानातून यांचा अब्बा आला, तरी 'देवभाऊ' सोडणार नाहीत... मुंबई : "आमच्यावर हिंदू-मुस्लिम केल्याची टीका

Chief Minister Devendra Fadnavis : नवकार महामंत्रामध्ये विश्व कल्याणाची शक्ती -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सर्व जगामध्ये नवकार महामंत्राचा आजच्या पवित्र दिवशी सामूहिक जप होत आहे. आपली संस्कृती ही

Nashik Fake Police : AI,पोलीस आणि स्त्रियांची लाखोंची फसवणूक; तोतया पोलीस अटकेत

नाशिक : नाशिक जिल्ह्यात तंत्रज्ञानाचा गैरवापर करून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्टिफिशियल

Pune Cycle Race : जगाच्या नकाशावर गेलेली सायकल स्पर्धा 26 ते 31 जानेवारी दरम्यान पुणे जिल्ह्यात रंगणार

पुणे : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल