मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच स्वीकारण्यासाठी 'कोडवर्ड'

खळबळजनक व्हिडिओ समोर; ५० हजारांसाठी एक, तर एक लाखासाठी मारल्या जायच्या दोन रेषा


मुंबई : अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयातील लिपिक राजू ढेरिंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केल्यानंतर आता या भ्रष्टाचाराचे धागेदोरे अधिक गडद झाले आहेत. या विभागात लाचेची रक्कम घेण्यासाठी चक्क 'कोडवर्ड'चा वापर केला जात असल्याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. मेडिकल परवान्यासाठी फाईलवर मारलेली 'एक रेषा' म्हणजे ५० हजार आणि 'दोन रेषा' म्हणजे १ लाख रुपये, अशा सांकेतिक भाषेत मंत्र्यांच्या दालनात वसुलीचे रॅकेट सुरू असल्याचा आरोप या व्हिडिओ काढणाऱ्या व्यावसायिकाने केला आहे.


मेडिकल व्यावसायिक निर्मल शर्मा यांनी या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन एक 'स्टिंग ऑपरेशन' केले. शर्मा यांचा मेडिकल परवाना एका महिन्यासाठी निलंबित झाला होता. तो पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांनी झिरवाळ यांच्या कार्यालयातील रामदास गाडे आणि राजू ढेरिंगे यांची भेट घेतली. यावेळी गाडे यांनी फाईलचा अभ्यास न करता त्यावर केवळ दोन रेषा मारल्या आणि 'राजूशी काय ते बोलून घ्या' असे सुचवले. या 'दोन रेषा' म्हणजेच १ लाख रुपयांची मागणी होती, असा दावा शर्मा यांनी केला आहे. अखेर ५५ हजार रुपयांवर तडजोड झाल्यानंतर हे काम मार्गी लावण्याचे आश्वासन देण्यात आले.



मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार


१२ फेब्रुवारी रोजी हरिराम घाची यांच्या तक्रारीवरून एसीबीने पहिली कारवाई केली होती. त्यानंतर आता निर्मल शर्मा यांनी थेट मुख्यमंत्री कार्यालयात तक्रार दाखल केली आहे. आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या या कृत्याबाबत मंत्री नरहरी झिरवाळ यांनी चौकशीचे आदेश दिले असले, तरी मंत्र्यांच्या नाकाखाली इतक्या मोठ्या प्रमाणावर 'अर्थपूर्ण' व्यवहार कसे चालत होते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


निर्मल शर्मा यांनी या संपूर्ण व्यवहाराचे रेकॉर्डिंग मुख्यमंत्री सचिवालयाकडे सुपूर्द केले आहे. "मंत्रालयात सर्वसामान्यांची कामे अडवून अशा प्रकारे वसुली केली जात असेल, तर पारदर्शकतेचा दावा फोल आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया शर्मा यांनी दिली आहे. एसीबी आता या नव्या पुराव्यांच्या आधारे रामदास गाडे यांच्यावरही कारवाई करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य