Kalyan News: कल्याण स्थानकावर महिला प्रवाशासोबत घडला भयंकर प्रकार

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानकावर संतापजनक घटना घडली आहे. मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या लोकलमधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. यादरम्यान भयानक गर्दी पाहायला मिळते. तसेच प्रवाशांमध्ये बाचाबाची आणि भांडण देखील होताना पाहायला मिळतात. अशातच आता महिला प्रवाशांमधील हिंसक प्रकार पाहायला मिळाला आहे. कल्याण रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी डब्यात चढण्यावरून झालेल्या वादात एका महिलेला दुसऱ्या महिलेने चक्क घेऊन तिला जखमी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.



नेमकं घडलं काय?



कल्याण पूर्वेकडील मलंगगड रोड परिसरात राहणाऱ्या प्रियंका थोरात या अंधेरी येथे नोकरीला आहेत. मंगळवारी सकाळी त्या कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक ६ वरून सीएसएमटीकडे जाणाऱ्या जलद लोकलच्या प्रथम श्रेणी डब्यात चढण्याचा प्रयत्न करत होत्या. लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने काही महिला उतरत होत्या तर काही चढत होत्या. यादरम्यान डब्यातून उतरणाऱ्या एका अज्ञात महिलेने प्रियंका यांना चढण्यास मज्जाव केला. प्रियंका यांनी डब्यात शिरण्याचा प्रयत्न केला असता, त्या अज्ञात महिलेने त्यांना बाहेर ढकलले आणि झटापटीत प्रियंका यांच्या दंडाला जोरात चावा घेतला. एवढ्यावरच न थांबता तिने प्रियंका यांचे बोट पिरगळले, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.


दुखापत होऊनही कामावर उशीर होऊ नये म्हणून प्रियंका यांनी त्याच लोकलने प्रवास केला. मात्र, संध्याकाळी डॉक्टरांकडे तपासणी केली असता बोटाला गंभीर इजा झाल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात (GRP) धाव घेऊन तक्रार नोंदवली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. फलाट क्रमांक ६ वरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपी महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Comments
Add Comment

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Police Dog Retirement : राज्य सरकारचा निर्णय! 10 वर्षे सेवा केल्यानंतरही पोलीस श्वान पोलिसांसोबतच राहणार

मुंबई : पोलीस दलात तब्बल 10 वर्षे सेवा बजावणाऱ्या श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत मुख्यमंत्री

Vile Parle Hit and Run : 15 वर्षांच्या मुलीला भरधाव बाईकने उडवलं, विलेपार्ले येथील हिट अँड रन प्रकरण

मुंबई : मुंबईतील विलेपार्ले पश्चिम परिसरात हिट अँड रनची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिठीबाई कॉलेजजवळील एन. एस.

Indian Railway : तिकीट बुक करताना करा फक्त एक सेटिंग; अतिरिक्त पैसे न देता होऊ शकते कोचची अपग्रेडेशन!

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ऑटो-अपग्रेडेशन

BMC Special Exhibition : महिला बचत गट आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राख्यांचे प्रदर्शन-विक्री

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात २४ ऑगस्ट २०२६ रोजी सर्व विभाग कार्यालयांमध्ये २४ व २५ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष

BMC School Educational Trip : महापालिका सातवीच्या मुलांची सहल भाईंदरमधील केशवसृष्टीत

मुंबई( सचिन धानजी) मुंबई महापालिका शाळेतील सन २०२६-२७ या शैक्षणिक सर्व मंडळाच्या इयत्ता ७ वीच्या