Grampanchayat Election: राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजणार; 'या' तारखांना निवडणूक होण्याची शक्यता

मुंबई: महाराष्ट्रातील ग्रामीण भागात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. जानेवारी २०२६ ते डिसेंबर २०२६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या, तसेच नवनवीन स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने अधिकृत प्रभाग रचना (वॉर्ड) कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेनुसार, येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.


ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.



प्रभाग रचनेचे महत्त्वाचे टप्पे


 

निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवली जाणार आहे. 'गुगल अर्थ'च्या साहाय्याने गावांचे नकाशे अंतिम करण्याची जबाबदारी तहसीलदारांवर असेल.


२७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तलाठी आणि ग्रामसेवक प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पाहणी करतील आणि प्रभागांच्या सीमा निश्चित करतील. २३ मार्च २०२६ पर्यंत जिल्हाधिकाऱ्यांच्या तपासणीनंतर राज्य निवडणूक आयोग या प्रस्तावाला अंतिम मान्यता देईल. त्यानंतर ७ एप्रिल २०२६ पर्यंत ग्रामपंचायतींची प्रारूप प्रभाग रचना अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल.


प्रभाग रचनेबाबत नागरिकांना आपले मत मांडण्यासाठी प्रशासनाने पुरेसा वेळ दिला आहे. ७ एप्रिल रोजी प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर १३ एप्रिल २०२६ रोजी नागरिकांना आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील. तर, २१ एप्रिल २०२६ पर्यंत प्राप्त झालेल्या हरकतींवर उपविभागीय अधिकारी सुनावणी घेतील. जिल्हाधिकारी सर्व प्रस्तावांची पडताळणी करून प्रभाग रचना २८ एप्रिल २०२६ पर्यंत अंतिम करतील.


४ मे २०२६ रोजी जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे. या कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता असल्याने, ग्रामीण भागात आतापासूनच राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी

बालकांच्या कर्करोग उपचारांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचा पुढाकार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकाराने मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष, भारत पेट्रोलियम

Nitesh Rane: मंत्री नितेश राणेंच्या प्रमुख उपस्थितीत साजरा झाला राष्ट्रीय सागरी दिन

मुंबई: भारताच्या आर्थिक महासत्तेकडे होणाऱ्या वाटचालीत सागरी क्षेत्राचा वाटा मोलाचा असून, बंदरांच्या

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोयना महोत्सवाची यशस्वी सांगता

सातारा: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर अग्रस्थानी नेण्याचा निर्धार व्यक्त करत पर्यटन, शेती आणि रोजगार

मुख्यमंत्र्यांच्या पाठबळामुळे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्पाला मिळाली चालना

मुंबई: जैवविविधतेने समृद्ध अशा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील जागेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन

‘पीएनजी’ क्षेत्रातील नागरिकांना ३० जूननंतर ‘एलपीजी’ गॅस पुरवठा बंद; पर्यायी इंधन म्हणून केरोसीनचे वाटप होणार

मुंबई: राज्यातील ज्या शहरी भागांमध्ये पाइपद्वारे गॅस (पीएनजी) जोडणीची सुविधा उपलब्ध आहे, तिथे नागरिकांनी पीएनजी