डोंबिवलीमध्ये रंगणार 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह'

मुंबई: शास्त्रीय संगीताची परंपरा आणि आधुनिकतेची सांगड घालत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे राहुल देशपांडे हे नाव आज घराघरांत पोहोचले आहे. पं. वसंतराव देशपांडे यांच्या समृद्ध परंपरेचा वारसा लाभलेल्या राहुल देशपांडे यांनी आपल्या दमदार, भावस्पर्शी आणि तितक्याच तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण गायकीने स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शास्त्रीय बंदिशी असोत, नाट्यसंगीताची रंगत असो किंवा भावगीतांची कोमलत, त्यांच्या सादरीकरणात नेहमीच सुरेलपणा, नेमकी लय आणि हृदयाला भिडणारी अभिव्यक्ती अनुभवायला मिळते. ‘कट्यार काळजात घुसली’मधील गाणी, ‘घेई छंद मकरंद’, ‘सूर निरागस हो’, ‘रंग रंगीला श्याम’ यांसारख्या रचना त्यांनी रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून ठेवल्या आहेत.


आता याच सुरेल प्रवासाचा एक नवा अध्याय डोंबिवलीत रंगणार आहे. ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ हा त्यांचा भव्यदिव्य लाईव्ह कॉन्सर्ट डोंबिवलीकरांना अनुभवता येणार आहे. खास महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात संगीताची एक अविस्मरणीय मैफल रंगणार आहे. विविध शैलींमधील निवडक सादरीकरणांमुळे हा कॉन्सर्ट रसिकांसाठी खास ठरणार आहे.


तरूण मित्र मंडळ, श्रीखंडेवाडी प्रस्तुत ‘द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह’ ही त्यांची मैफल केवळ सुरांचा उत्सव नसून सामाजिक कार्यासाठी आयोजित विशेष निधी संकलन कार्यक्रम आहे. या संपूर्ण इव्हेंटची जबाबदारी सांभाळली आहे इव्हेंट फॅक्टरी यांनी. यात त्यांना विशेष सहकार्य मिळाले आहार डोंबिवलीकर संस्थेचे त्यामुळे संगीताच्या माध्यमातून एका उदात्त हेतूसाठी हातभार लावण्याची ही संधी डोंबिवलीकरांना मिळणार आहे.


हा भव्य कार्यक्रम संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथे पार पडणार असून, डोंबिवलीकरांसाठी ही एक पर्वणीच ठरणार आहे. या कॅान्सर्टचे तिकिट्स बुक माय शोवर उपलब्ध आहेत. राहुल देशपांडे यांच्या जादुई आवाजात थेट मैफलीचा अनुभव घेण्याची संधी प्रथमच मिळत असल्याने संगीतप्रेमी प्रचंड उत्सुक आहेत.


या निमित्ताने राहुल देशपांडे म्हणाले, ''डोंबिवलीतील रसिकांसमोर 'द राहुल देशपांडे कलेक्टिव्ह' सादर करताना मला विशेष आनंद होत आहे. महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या कार्यक्रमातून संगीताचा उत्सव साजरा करायचा आहे. शास्त्रीय संगीतापासून नाट्यसंगीतापर्यंत आणि भावगीतांपासून नव्या धाटणीच्या रचनांपर्यंतचा प्रवास आम्ही या कॉन्सर्टमध्ये घडवणार आहोत. डोंबिवलीकरांनी या सुरेल मैफलीचा जरूर भाग व्हावे.”

Comments
Add Comment

Kuku Kohli Dies : चित्रपट दिग्दर्शक कुकू कोहली यांचे निधन; अश्रूधाल्या डोळ्यांनी अरुणा इराणींचा निरोप, बॉलिवूड कलाकारांची उपस्थिती

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता अजय देवगणला (Ajay Devgan) 'फूल और कांटे' चित्रपटातून पहिला ब्रेक देणारे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad : ट्रोलिंगचा दणका! क्रिती सेननला बसला मोठा धक्का; वादानंतर ब्रँडने जाहिरातच घेतली मागे

Kriti Sanon Raksha Bandhan Ad  : अभिनेत्री क्रिती सेनन रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली होती. तिच्या

Kuku Kohli : अजय देवगणला स्टार बनवणाऱ्या दिग्दर्शकाचं निधन; कुकू कोहली यांनी वयाच्या ७७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ‘फूल और कांटे’ या चित्रपटातून अभिनेता अजय देवगणला हिंदी चित्रपटसृष्टीत लॉन्च करणारे ज्येष्ठ दिग्दर्शक

Gandhari Film : 'गांधारी' चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात; पटकथा लेखकाचा नेटफ्लिक्सवर कथा चोरीचा आरोप

मुंबई : तापसी पन्नूचा आगामी चित्रपट ‘गांधारी’ प्रदर्शित होण्याआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. हा चित्रपट ३

Kriti Sanon : डीप-नेक ब्लाउज अन् 'वोक अजेंडा'चे आरोप; रक्षाबंधन जाहिरातीतील ट्रोलिंगवरून कृती सेननचं सडेतोड उत्तर

अभिनेत्री कृती सेनन (Kriti Sanon) सध्या एका रक्षाबंधनाच्या जाहिरातीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आली आहे. या

Siddharth Jadhav : "माझ्या मृत्यूची एवढी कसली घाई आहे तुम्हाला ?"; 'त्या' बातमीवरून सिद्धार्थ जाधव संतापला

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सध्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत