२०३० पर्यंत राज्यात ५० टक्के हरित ऊर्जेचे उद्दिष्ट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; देशातील पहिल्या 'क्लायमेट वीक'चे मुंबईत उद्घाटन

मुंबई : "राज्यात सध्या अक्षय ऊर्जेची क्षमता झपाट्याने वाढवली जात असून, २०३० पर्यंत एकूण वीज निर्मितीत हरित ऊर्जेचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक करण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. यासाठी ग्रीन हायड्रोजन, इलेक्ट्रिक वाहतूक आणि शाश्वत पायाभूत सुविधांवर भर दिला जात आहे", असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केले.


देशातील पहिल्या 'मुंबई क्लायमेट वीक'चे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिओ वर्ल्ड सेंटर येथे झाले. यावेळी केंद्रीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आणि जागतिक पर्यावरणातील मान्यवर उपस्थित होते. "हवामान कृतीकडे आम्ही केवळ नियमांचे पालन म्हणून पाहत नाही, तर ती गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीची एक मोठी संधी मानतो. जे राज्य हे बदल वेगाने स्वीकारेल, तेच जागतिक भांडवल आणि कौशल्य आकर्षित करू शकेल," असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.


"हवामान बदलाचे संकट हे केवळ पर्यावरणीय आव्हान नसून, भविष्यातील आर्थिक स्पर्धात्मकतेची ती एक 'किल्ली' आहे. या बदलाचा फटका मुंबईसारख्या किनारी शहरांना आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत आहे. त्यामुळे हवामान बदलावरील कृती कार्यक्रमाचे जागतिक नेतृत्व करण्यास महाराष्ट्र आता पूर्णपणे सज्ज आहे," अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.



महाराष्ट्राला अतिरिक्त १ लाख सौर पंप


'पीएम कुसुम' योजनेत महाराष्ट्राने देशात सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी राज्याचे कौतुक केले. या यशाची दखल घेत त्यांनी महाराष्ट्रासाठी आणखी १ लाख सौर कृषी पंप मंजूर करण्याची घोषणा यावेळी केली. "भारत आर्थिक विकास आणि उत्सर्जन कपात यांची सांगड घालून जगासमोर आदर्श निर्माण करत आहे," असे जोशी म्हणाले.



जागतिक करारांवर स्वाक्षरी


या परिषदेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाचे सामंजस्य करार केले. संयुक्त राष्ट्र संघ पर्यावरण कार्यक्रम आणि 'सी-४० सिटीज' या जागतिक संस्थांच्या सोबतीने मुंबईचा 'हवामान अनुकूल आराखडा' तयार केला जाणार आहे.

Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे