NA परवानगी रद्द; महसूल कायद्यात मोठा ऐतिहासिक बदल

मुंबई : राज्य शासनाने शेतजमिनीचा निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक वापर करण्यासाठी आवश्यक असलेली ना परवानगीची अट रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बांधकाम व्यावसायिक, गृहनिर्माण संस्था आणि जमीनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.


नव्या नियमानुसार विकास आराखड्याशी सुसंगत असलेल्या जमिनींसाठी स्थानिक नियोजन प्राधिकरणाने दिलेली बांधकाम परवानगी हीच अकृषिक परवानगी म्हणून ग्राह्य धरली जाणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र मंजुरी घेण्याची आवश्यकता राहणार नाही. याशिवाय वार्षिक बिनशेती कराची अटही रद्द करण्यात आली आहे.



बांधकाम नकाशा कुठे मिळणार?


राज्यात घर किंवा इमारत उभारण्यासाठी महानगरपालिका, नगरपालिका किंवा नगररचना विभागाकडून अधिकृत बांधकाम नकाशा मंजुरी घेणे बंधनकारक राहील. संबंधित स्थानिक प्राधिकरणाकडेच अर्ज करावा लागणार आहे.



अर्ज कसा कराल?


बांधकाम मंजुरीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज सादर झाल्यानंतर महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे सातबारा उताऱ्यात आवश्यक नोंद आपोआप होणार आहे.


फक्त बांधकाम परवानगी मिळाल्यामुळे भोगवटादार वर्ग दोनमध्ये आपोआप बदल होणार नाही. तर ७/१२ उताऱ्यात आपोआप फेरफार नोंद घेतली जाईल, त्यासाठी आवश्यक शुल्क स्वतंत्रपणे भरावे लागेल. अर्जानंतर छाननी शुल्कही ऑनलाईन भरावे लागेल.


नोंदणीकृत वास्तुविशारद नियमानुसार नकाशा तयार करून तो अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करतात. त्यानंतर नगररचना विभागाकडून तांत्रिक पडताळणी केली जाते. सर्व अटी पूर्ण झाल्यास डिजिटल स्वाक्षरीसह मंजुरी प्रमाणपत्र दिले जाते.



आवश्यक कागदपत्रांची यादी


सातबारा उतारा किंवा मालमत्ता पत्रिका
भूमी अभिलेख विभागाचा मोजणी नकाशा
नोंदणीकृत वास्तुविशारद परवान्याची प्रत
चालू वर्षाचा घरपट्टी किंवा मालमत्ता कर भरल्याची पावती
अग्निशमन, पर्यावरण विभाग, विमानतळ प्राधिकरण यांसारख्या संबंधित यंत्रणांची ना हरकत प्रमाणपत्रे


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे बांधकाम परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र स्थानिक प्राधिकरणाच्या नियमांचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे.

Comments
Add Comment

सफाईच्या कामांचे ऑडिट करण्यासाठी आयआयटी मुंबईची मदत घेणार

मुंबई: मुंबईतील नालेसफाईच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून ज्याठिकाणी मिठी नदीच्या कामासाठी नव्याने निविदा

महापालिका शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी आता जेम पोर्टलवरून निविदा

मुंबई: मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये वितरीत केल्या जाणाऱ्या २७ शालेय वस्तूंची खरेदीची प्रक्रिया रद्द करून

महालक्ष्मी येथे लहान प्राणी, पक्ष्यांच्या मृतदेहांवर अंत्यविधीची सुविधा; लहान पाळीव प्राण्यांचे रुग्णालय लवकरच होणार सुरू

मुंबई: मुंबई महानगरपालिका आणि टाटा ट्रस्ट संचालित लहान प्राण्यांच्या रुग्णालयात लहान प्राणी व पक्ष्यांच्या

दिव्यांगांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देत मुख्य प्रवाहात आणण्यावर भर; दिव्यांग कल्याण विभाग आता दिव्यांग सक्षमीकरण विभाग नावाने ओळखला जाणार

मुंबई: राज्यातील दिव्यांग व्यक्तींच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत

शिधावाटप विभागाच्या धडक कारवाईत वरळीतील गॅस सिलिंडरचा काळाबाजार उघड

मुंबई: वरळी परिसरात घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीवर शिधावाटप विभागाने धडक

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी