अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा? - थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी शिंदे समितीकडे पाठवण्याच्या राज्य सरकारच्या सूचना

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. थकीत कर्जदार शेतकऱ्यांची सविस्तर माहिती 'शिंदे समिती'कडे पाठवण्याच्या सूचना राज्य सरकारने सर्व बँकांना दिल्या आहेत. यामुळे येत्या ६ मार्च रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात राज्यातील बळीराजाला संपूर्ण कर्जमाफी मिळणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

राज्यातील विविध जिल्हा बँकांमार्फत जून २०२५ पर्यंत थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्ह्यातील सेवा सहकारी सोसायट्या, सचिव, बँकेचे तपास अधिकारी आणि शाखाधिकारी यांच्या माध्यमातून हे संकलन सुरू आहे. या प्रक्रियेत सहनिबंधक आणि निबंधक कार्यालयातील अधिकाऱ्यांचेही सहकार्य घेतले जात आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी ते २५ मार्च २०२६ या कालावधीत मुंबईत पार पडणार आहे. ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कर्जमाफीचा निर्णय घ्यायचा झाल्यास नेमकी किती आर्थिक तरतूद करावी लागेल, यासाठी ही अचूक आकडेवारी महत्त्वाची ठरणार आहे. प्रशासनातील सूत्रांच्या माहितीनुसार, पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर अंतिम शिक्कामोर्तब होऊ शकते.

शेतकऱ्यांचे डोळे अधिवेशनाकडे


राज्यात गेल्या काही काळापासून नैसर्गिक आपत्ती आणि शेतीमालाच्या दरातील चढ-उतारामुळे शेतकरी अडचणीत आहे. अशा परिस्थितीत ही कर्जमाफी झाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे.
Comments
Add Comment

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

मुंबई मेट्रोच्या वेळापत्रकात ८ एप्रिलपासून बदल; लाईन ९ व २ बी सेवेत, प्रवाशांसाठी अधिक सुलभ व जलद सेवा

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो जाळ्याच्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर प्रदेश विकास

Sunetra Pawar: 'बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी महत्त्वाची'

बारामती: बारामती हा केवळ मतदारसंघ नसून दादांचा श्वास होता आणि त्या श्वासाशी नाळ जुळलेली प्रत्येक व्यक्ती

Chandrashekhar Bawankule: अजित दादांची सावली आता बारामतीत सुनेत्रा माऊली; बावनकुळेंनी जागवल्या ३२ वर्षांच्या ऋणानुबंधांच्या आठवणी

बारामती: "ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्राच्या राजकारणात चांद्यापासून बांद्यापर्यंत वजन होतं, ज्यांनी उभं आयुष्य