ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही लोकचळवळ व्हावी; मंत्री भरत गोगावले यांचे विधान 

'सक्षम २०२५-२६' अभियानाचा समारोप


मुंबई : इंधनाची बचत ही केवळ गरज नसून ती एक देशसेवा आहे. ऊर्जा सुरक्षा आणि पर्यावरण रक्षण ही आता एक लोकचळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन फलोत्पादन, रोजगार हमी योजना आणि खार जमीन विकास मंत्री भरत गोगावले यांनी केले.केंद्र शासनाच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली देशभर राबविण्यात आलेल्या 'संरक्षण क्षमता महोत्सव (सक्षम) २०२५-२६' या महाराष्ट्र राज्य स्तरीय अभियानाचा सांगता समारंभ यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडला, त्यावेळी ते बोलत होते.


मंत्री गोगावले म्हणाले की, वाढते प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी नैसर्गिक आणि हरित इंधनाचा वापर वाढवणे आवश्यक आहे. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करून देशाचे परकीय चलन वाचवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने इंधन बचतीचे कर्तव्य पार पाडावे.

सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांचा पुढाकार


१ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत राबविण्यात आलेल्या या अभियानाचे मुख्य घोषवाक्य ‘तेल आणि वायू वाचवा, हरित ऊर्जेचा स्वीकार करा’ असे होते. जनसामान्यांमध्ये इंधन बचतीचा संदेश पोहोचवणे, परकीय चलनाची बचत करणे आणि हरितगृह वायूंचे उत्सर्जन कमी करून निसर्गाचे रक्षण करणे. या अभियानात बीपीसीएल, एचपीसीएल, आयओसी आणि गेल इंडिया यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घेतला.

विविध उपक्रमांनी गाजला महोत्सव


गेल्या १५ दिवसांत राज्यात विविध स्तरांवर प्रबोधनपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये सायकल रॅली, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, आणि वाहनचालकांसाठी विशेष तांत्रिक कार्यशाळांचा समावेश होता. या अभियानाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि गृहिणींपर्यंत इंधन बचतीचे तंत्र पोहोचवण्यात आले.


यावेळी मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते अभियानातील विविध स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान चिन्ह व पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्यस्तरीय समन्वयक उमेश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्याला बीपीसीएलचे थॉमस जेम्स, एचपीसीएलचे मुकुंद जवंजल, आयओसीएलचे संतोष दैत, गेल इंडियाचे मोहम्मद शफी, मुख्य प्रबंधक दीपक वाघ, वरिष्ठ प्रबंधक रितेश जाधव यांसह तेल कंपन्यांचे अधिकारी, इंधन वितरक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन मुख्य प्रबंधक दीपक वाघ यांनी केले.
Comments
Add Comment

Mumbai: तुमचा वर्षाचा पगार नाही एवढी मोठी लाच, मंत्रालयातील कक्ष अधिकारी जाळ्यात; एसीबीने ठोकल्या बेड्या..

मुंबई: राज्याचं प्रशासन सेवेतलं सर्वोच्च स्थान, केंद्रबिंदु असलेल्या मंत्रालयात काही दिवसांपूर्वी एका

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे होणार १० पदरी; टोल वसुली....

२०६० पर्यंत टोल वसुली सुरूच  मुंबई : वाढत्या वाहतुकीमुळे कायम कोंडीचा सामना करणाऱ्या मुंबई–पुणे एक्सप्रेसवे वर

रस्ते तसेच रेल्वे कन्व्हर्टची सफाई रिमोट कंट्रोल मशिन्सद्वारे

मुंबई : मुंबई महापालिकेच्यावतीने रस्ते आणि रेल्वे कल्व्हर्ट यांच्या सफाईसाठी रिमोट कंट्रोल स्वींग लोडर मशीनचा

BMC : मुंबईसाठी तब्बल १३,५०० मोठ्या आकाराच्या कचरा पेट्यांची खरेदी

सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करताना या ठेवणार कुठे? मुंबई : मुंबईतील मोठ्या आकाराच्या कचरा कुंड्या हटवून

Navi Mumbai: नवी मुंबईतील भोंदूची विकृती उघड; काळी जादू करण्यासाठी महिलांना विवस्त्र व्हायला सांगत...

नवी मुंबई: राज्यात सध्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. अशातच आता नवी मुंबईतून अशीच एक धक्कादायक

Ashok Kharat Case : भोंदूबाबा प्रकरणातील स्त्रिया मानसिक धक्क्यात; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे.....

मुंबई : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतले आहे, भोंदूबाबा सोबतचे