वैभव सूर्यवंशी देणार १० वीची परीक्षा?

मुंबई : भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख खेळाडू आणि अवघ्या १४ व्या वर्षी चर्चेत आलेला वैभव सूर्यवंशी याच्याबाबत एक बातमी समोर आली आहे. शैक्षणिक वर्षअखेर होणारी (CBSE) दहावीची परीक्षा तो यंदा देणार की नाही याविषयी त्याच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे.


सोशल मीडियावर हॉलतिकीट व्हायरल


काही दिवसांपासून एक हॉल तिकीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षा केंद्रावर सुरक्षेची तयारी वाढवल्याच्या चर्चाही रंगल्या होत्या. मात्र, शाळा प्रशासनाने कोणतीही विशेष सवलत दिली जाणार नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.


बिहारमधील ताजपूर येथे राहणारा वैभव ताजपूर येथील मॉडेस्टी स्कूलचा विद्यार्थी आहे परीक्षेचा अर्जही त्याने भरला होता. परंतु तो सध्या सराव शिबिरे, राष्ट्रीय स्तरावरील सामने आणि विविध स्पर्धांमध्ये गुंतलेला आहे. सलग सामने आणि प्रवासामुळे त्याला अभ्यासाला पुरेसा वेळ देता आला नाही, अशी माहिती समोर आली आहे. कुटुंबीय आणि शाळा व्यवस्थापन यांच्यातील चर्चेनंतरच त्याने यंदा बोर्ड परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.



अंडर-१९ विश्वचषकातील दमदार कामगिरी


२०२६ मधील आयसीसी अंडर १९ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत त्याने भारतीय संघासाठी उल्लेखनीय योगदान दिले. सात सामन्यांत ६२.७१ च्या सरासरीने ४३९ धावा करत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रक्रमावर राहिला. अंतिम सामन्यात इंग्लंड अंडर १९ क्रिकेट संघ विरुद्ध साकारलेली १७५ धावांची खेळी विशेष गाजली. १६९ पेक्षा अधिक स्ट्राईक रेटसह त्याने आक्रमक फलंदाजीचे दर्शन घडवले.

Comments
Add Comment

IPL 2026: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स आज आमनेसामने; विजयासाठी दोन्ही संघ सज्ज

मुंबई : आयपीएल 2026 मधील आजचा सामना क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स

Umpire Killed Over Run-Out Argument : विशाखापट्टणम हादरलं! रनआऊट दिलं म्हणून थेट अंपायरचीच केली हत्या

विशाखापट्टणम येथे घडलेल्या एका धक्कादायक घटनेने क्रीडा क्षेत्र हादरले आहे. स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या

IPL 2026 Avesh Khan : लखनऊच्या विजयावरून वाद, आवेश खानच्या 'त्या' कृतीमुळे सनरायझर्स नाराज

मुंबई : रविवार ५ एप्रिल रोजी खेळल्या गेलेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या सामन्यात सनरायझर्स

IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुची चेन्नई सुपर किंग्सवर 43 धावांनी मात

बंगळूरु : रॉयल चॅलेंजर्स बंगळूर (आरसीबी) संघाने चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा ४३ धावांनी पराभव केला. आयपीएल

FIDE Candidates Tournament 2026 : भारतीय ग्रँडमास्टर वैशालीचा सलग दुसरा विजय

सायप्रस : भारतीय ग्रँडमास्टर आर. वैशालीने फिडे कॅन्डिडेट्स टूर्नामेंट २०२६ च्या सातव्या फेरीत शानदार कामगिरी

Mohammed Shami : ज्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगला त्यानेच...; झहीर खानला पछाडत शमीने रचला नवा विक्रम!

आयपीएल २०२६ स्पर्धेत रविवारी (५ एप्रिल) डबल हेडर सामन्यांचा थरार रंगला असून हैदराबादच्या मैदानावर झालेल्या