Mahashivratri Wishes : संयम आणि शक्तीचा सुरेख संगम म्हणजे महाशिवरात्र, महाशिवरात्रीनिमित्त द्या मराठीतून शुभेच्छा

मुंबई : आजच्या धकाधकीच्या जीवनात महाशिवरात्र आपल्याला संयम, ध्यान आणि आंतरिक शांततेचे महत्त्व समजावून सांगते. 'शिव' म्हणजे कल्याण आणि 'रात्री' म्हणजे विश्रांती. अंतरात्म्याला विश्रांती देण्याचा संदेश महाशिवरात्री अर्थात महाशिवरात्र देते. महाशिवरात्रीला शंकराची उपासना करण्यासाठी ध्यान लावण्यास सांगितले जाते. या ध्यान लावण्याच्या कृतीतून आपण नकळत अंतरात्म्याला विश्रांती देतो.


महाशिवरात्र म्हणजे फक्त शंकराची पूजा करणे नाही तर नकारात्मक विचारांची जळमटे दूर करणे, सकारात्मक विचार स्वीकारणे. यंदाच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपल्यातील नकारात्मक विचारांचा त्याग करा आणि सकारात्मकतेकडे वाटचाल करा. प्रगती करा. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य नांदो ही सदिच्छा व्यक्त करत महाशिवरात्रीनिमित्त देत आहोत निवडक मराठमोळ्या महाशिवरात्रीच्या शुभेच्छा.




  • भक्तीत शक्ती आणि शक्तीमध्ये शिव, हर हर महादेव! Happy Mahashivratri 2026

  • भोलेनाथाच्या कृपेने तुमच्या प्रगतीचे सर्व मार्ग खुले होवो. Happy Mahashivratri 2026

  • सत्य म्हणजे शिव आणि सर्वात सुंदर अनुभव म्हणजे शिवभक्ती. Happy Mahashivratri 2026

  • शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या महाकालाच्या भक्तीत तल्लीन होऊ, Happy Mahashivratri 2026

  • अंगाला भस्म, हातात त्रिशूळ... असा आहे माझा भोळानाथ, जो भक्तांच्या हाकेला धावतो. Happy Mahashivratri 2026

  • भोलेनाथाच्या आशीर्वादाने तुमची सर्व कामे सहज आणि सोपी होवो. शुभ महाशिवरात्री!Happy Mahashivratri 2026

  • कैलासपती, उमापती, महादेवा तुमच्या चरणी आमचे मस्तक सदैव नतमस्तक राहो. Happy Mahashivratri 2026

  • भगवान शंकराचा वरदहस्त तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो, हीच प्रार्थना. Happy Mahashivratri 2026

  • ज्याचा कोणी नाही, त्याचा महाकाल आहे. महाशिवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Happy Mahashivratri 2026

  • महाशिवरात्रीला तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धीचा अभिषेक होवो. Happy Mahashivratri 2026

  • शिवरात्रीची ही पावन रात्र तुमच्या अंतरातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देवो. Happy Mahashivratri 2026

  • नाम घेता शिवशंभूचे, दुःख पळते दूर, भक्तीच्या या सागरात, व्हावे आपण तल्लीन! Happy Mahashivratri 2026

  • महादेवाच्या डमरूच्या नादाने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता दूर होवो. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

  • ज्याच्या जटेत गंगा, माथ्यावर चंद्रकोर आणि कंठात विष आहे, अशा नीलकंठाला त्रिवार वंदन. महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

  • ओम नमः शिवाय! महादेवाच्या नामस्मरणाने तुमच्या जीवनातील सर्व संकटे भस्म होवोत. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!

Comments
Add Comment

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंची चिंता वाढली; चिरंजीव ३ दिवसांपासून रुग्णालयात

उद्धव ठाकरे यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या मुलाची प्रकृती

Mhada Lottery Home: म्हाडाकडून सर्वसामान्यांना दिलासा; पैसे भरण्याच्या नियमात मोठा बदल

मुंबई: आगामी काळात 'अॅडव्हान्स कॉन्ट्रीब्युशन स्कीम' अंतर्गत मुंबईत घरे उभारण्यात येणार आहेत. खासगी बिल्डर

त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी जाणाऱ्या भाजप खासदाराच्या रेंज रोव्हरला भर रस्त्यात लागली आग

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अग्नितांडव सुरु आहे. अशातच आता त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन

म्हाडाकडे महापालिकेच्या मालमत्ता कराची ६३ कोटींची थकबाकी

मुंबई: मुंबई महापालिकेने आता मालमत्ता कराची थकीत रक्कम वसूल करण्याची मोहिम हाती घेत मोठ्या थकबाकीदारांना

सोमवारी महापालिका सभागृहनेते आणि विरोधी पक्षनेत्यांच्या नावाची घोषणा होणार

मुंबई: मुंबईचे महापौरआणि उपमहापौर पदाची निवडणूक पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष सभागृहनेते आणि विरोधी

Mulund Metro Accident: मुलुंड मेट्रो स्लॅबप्रकरणी कार्यकारी अभियंता निलंबित; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली कारवाई

मुंबई: मेट्रो लाईन ४ (वडाळा-कासारवडवली) मार्गावर मुलुंड येथे शनिवारी झालेल्या दुर्घटने प्रकरणी उपमुख्यमंत्री