मुलुंड: मुलूंडमध्ये मेट्रोच्या बांधकामाचा अचानक स्लॅब कोसळ्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. स्लॅबखाली एका व्यक्तीसह दोन वहाने दबल्याची माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी बांधकाम सुरू असलेल्या सिमेंट मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळला. रस्त्याने जाणाऱ्या रिक्षा आणि एका कारवर हा स्लॅब पडल्याने या घटनेत किमान तीन ते चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
एमएमआरडीएने दिलेल्या माहितीनुसार, "ही घटना आज दुपारी १२:१५ वाजता मुलुंड अग्निशमन केंद्राजवळील राजीव (मिलान) स्ट्रीटमधील मेट्रो लाईन बांधकामाच्या पियर पी१९६ जवळ घडली.
या दुर्घटनेमुळे मुलूंड येथील हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या आधी देखील मेट्रो प्रकल्पावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. अशातच हा स्लॅब कोसळला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा स्लॅब एका चार चाकी गाडीवर आणि रिक्षावर कोसळला आहे. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
मुलूंड येथील मेट्रो दुर्घटनेत आणखी कोणी जखमी झाले आहे का? किंवा दुर्घटना नेमकी कशी घडली याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे यावर प्रशासन काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु:
मिळालेल्या माहितीनुसार मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री (LBS Road) मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचे काम सुरु आहे. त्यासाठी याठिकाणी दररोज भलेमोठे गर्डर आणि स्लॅब वरती चढवण्याचे काम सुरु असते. आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला. त्यावेळी खालच्या एलबीएस रोडवरुन वाहने ये-जा करत होती. हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर आणि कारवर कोसळला आहे.







